Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील युवा नेते सालम चिमणे यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश|chivari vanchit bahujan party

चिवरी येथील युवा नेते सालम चिमणे यांचा वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये जाहीर प्रवेश


चिवरी / प्रतिनिधी बिभिषन मिटकरी : श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून  आंबेडकरी घराण्याची निष्ठा जपण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील युवा नेते सालम  चिमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने , युवा जिल्हा उपाध्यक्ष आशिष लोंढे ,जिल्हा संघटक परमेश्वर लोखंडे ,युवा जिल्हा प्रवक्ता गोविंद भंडारे ,निलेगाव शाखाध्यक्ष अकबर शेखदार अणदूरचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उस्मान नदाफ ,तुळजापूर तालुका युवा सचिव विनायक दुपारगुडे चिवरी गावचे शाखा महासचिव अणदूरचे युवा नेते  अक्षय भाईजी घुगे ,जगदीश लोखंडे ,अंगद लोखंडे मोईन भागवान संतोष गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments