नळदुर्ग बस स्थानकात चिखलासह खड्ड्याचे साम्राज्य, चिखलासह घाण पाण्यातून प्रवाशांना करावे लागते मार्गक्रमण, प्रवाशांना नरक यातना
नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदृग बस स्थानकात मागील आठवड्यापासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यामुळे शाळकरी मुले मुली, अबाल वृद्ध महिला भाविक पर्यटकांना, चिखलाचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बस स्थानक इमारतीचे काम पूर्ण झाले परंतु परिसरामध्ये डांबरीकरण, सिमेंट किंवा फेवर ब्लॉकची काम होणे गरजेचे होते. सध्या प्रवाशांना एक पाय चिखलात तर दुसरा खड्ड्यात अशी अवस्था निर्माण झाली आहे. बस स्थानक परिसरात पूर्णता गटारीचे स्वरूप आले आहे. बस स्थानकाची दुरावस्था कधी संपणार असा सवाल प्रवाशातून केला जात आहे. नळदृग बस स्थानक हे मुंबई हैदराबाद मार्गावरील असल्याने येथे विविध जिल्ह्यातून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. तर नळदृग हे परिसरातील बाजारपेठेसाठी मोठे शहर असल्याने येथे तीस ते चाळीस गावातील नागरिक येत असतात. या बस स्थानकात नेहमी प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर दिसून येते. परिणामी या दुरावस्थेला तोंड देत प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांच्या दृष्टीने ही एक गंभीर समस्या असून या समस्येकडे संबंधित आगर प्रमुख, लोकप्रतिनिधी, संबंधित प्रशासन यांनी तात्काळ लक्ष घालून प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी उपाय योजना राबवण्यात याव्या अशी मागणी मागणी होत आहे.
0 Comments