सांगोला : सावकाराच्या दमदाटीला घाबरून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, सावकार विरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : व्याजाने दिलेल्या पैशाच्या कारणावरून सावकाराकडून होणाऱ्या दमदाटीला घाबरून तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केल्या प्रकरणी एक जनाविरुद्ध सांगोला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येची ही घटना एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मिरज पंढरपूर रेल्वे मार्गावर घडली.
अनिरुद्ध शिवाजी डांगे वय (25) राहणार खडतर गल्ली सांगोला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक वृत्त असे की अनिरुद्ध डांगे यास सावकार रोहित देठे राहणार मस्के कॉलनी सांगोला यांनी व्याजाने पैसे दिले होते. सदर व्याजाच्या पैशासाठी रोहित देठे व त्याचे दोन साथीदार वारंवार तगादा लावून शिवीगाळ करत होते तसेच तू आत्महत्या कर नाहीतर काहीही कर पण आमची व्याजाचे पैस दे असे म्हणून दमदाटी केली होती . त्यामुळे अनिरुद्ध शिवाजी डांगे यांनी आत्महत्या केली अशी फिर्याद अनिरुद्ध ची भाऊ प्रफुल शिवाजी डांगे यांनी पोलिसांत दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.
0 Comments