धाराशिव पंचायत समितीचा लाचखोर तांत्रिक सहाय्यक गजाआड ११५०० रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले, धाराशिव पंचायत समितीचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
धाराशिव: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर काम सुरू करण्यापूर्वी जिओ टॅगिंग करून ऑनलाईन फोटो अपलोड करण्यासाठी 11500 ची लाच घेताना धाराशिव पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक तांत्रिक कंत्राटी रंगेहात पकडून गजाआड केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दि,(४) रोजी ही कारवाई केली. विशेष साहेबांसाठी दहा हजार तर स्वतः दीड हजार रुपये असे सांगून ११ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारण्यात आली. एसीबीच्या या कारवाईमुळे पंचायत समिती कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे सरकारी बाबू सर्वसामान्य नागरिकाची कशी अडवणूक व आर्थिक पिळवणूक करतात ते या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
याबाबत एसीबीने दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाली आहे सदर विहिरीचे काम सुरू करण्यापूर्वी जिओ टॅगिंग करून ऑनलाईन अर्ज अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांनी धाराशिव पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक प्रवीण पार्श्वनाथ गडदे (कंत्राटी) राहणार धाराशिव यांची भेट घेतली. यावेळी तांत्रिक सहाय्यक गडदे यांनी जिओ टॅगिंग करून ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे बुधवारी दि, ३ रोजी 11 हजार पाचशे रुपयाची लाच मागितली विशेषता साहेबांसाठी दहा हजार रुपये तर स्वतःसाठी एक हजार पाचशे रुपये अशी एकूण 11500 रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे गडदे यांनी केली होती.
तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला होता .दरम्यान धाराशिव पंचायत समिती कार्यालयाचे तांत्रिक सहाय्यक गडदे यांनी तक्रारदार यांच्याकडे सिंचन विहीर कामाचे जिओ टॅगिंग करून ऑनलाईन फोटो अपलोड करण्यासाठी पंच साक्षीदारा समक्ष साहेबांसाठी दहा हजार रुपये तर स्वतःसाठी दीड हजार रुपये एकूण 11500 रुपयांची मागणी करून लाज स्वीकारली यावेळी एसीबीच्या पथकाने गडदे यास लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतली सायंकाळी उशिरापर्यंत धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. डीवायएसपी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब कदम पोलीस आमदार सिद्धेश्वर तावस्कर आशिष पाटील ,अविनाश आचार्य यांच्या पथकाने ही कारवाई केल.
पंचायत समिती अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार
धाराशिव पंचायत समितीचे तांत्रिक सहाय्यक गडदे यांनी साहेबांचे नाव सांगून तक्रारदार यांच्याकडून लाच घेतली आहे याप्रकरणी एसीबीने गडदे याच ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे पंचायत समितीचा कारभार हा गट विकास अधिकारी यांच्या अखत्यारीत चालतो .या लाचखोरीच्या प्रकरणात पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्याचा हात आहे का ? या अनुषंगाने देखील एसीबी कडून तपास सुरू असल्याची माहिती एसीबीचे उपअधीक्षक श्री सिद्धाराम मैत्री यांनी सांगितले त्यामुळे या चौकशीत काय निष्पन्न होणार? याकडे नागरिकाचे लक्ष वेधले आहे.
0 Comments