धाराशिव : जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामस्तरीय पडताळणी समित्या, जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
धाराशिव: जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणतेही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणा काम करीत आहे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ग्रामस्तरीय पडताळणी समिती गठित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि प्रश्नांमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिस्थिती आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र राहतील या योजनेची देखरेख व स नियंत्रण जिल्हास्तरीय समिती करणार असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामस्थरीय पडताळणी समिती गठित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिली आहे .या समितीमध्ये सरपंच कृषी सहाय्यक आशा वर्कर अंगणवाडी शिल्पा स्थानिक आपली सरकार सेवा केंद्र महा-ई-सेवा केंद्र हे सर्व सदस्य तलाठी हे सहसचिव तर ग्रामसेवक हे सदस्य सचिव आहेत.
अशी असेल समितीचे कामकाज
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ग्राम स्तरावर कक्ष स्थापन करणे अंगणवाडी सेविका मुख्य सेविका ग्रामपंचायत केंद्र ग्रामसेवक यांनी अर्ज शुक्रत करणे अर्जास क्रमांक देऊन लाभार्थी महिलेस पाच पावती देणे व अर्जाची स्वतंत्र नोंदवही ठेवणे योजनेस ग्राम स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देणे तसेच मिळावे आयोजित करणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ग्राम स्तरावर प्राप्त होणारे अर्ज रोजच्या रोज तालुकास्तरीय समितीकडे जमा करणे असे या समितीचे कामकाजाचे स्वरूप राहणार आहे जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आदेशातून नमूद केली आहे.
0 Comments