रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची आमीष दाखवून वरिष्ठ वकिलालाच तब्बल 25 लाखांना गंडवले-
लातूर: एका वकिलाकडे ज्युनिअरशिप करीत असताना अंबाजोगाई येथील एका रियल इस्टेट व ट्रेडिंग कंपनीचा संस्थापक झालेल्या ज्युनिअर वकिलाने आपल्याच वरिष्ठाला पैसे गुंतवण्यास लावून त्यांची 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना लातूरमध्ये जून 2019 ते जून 2022 या कालावधीत घडली या प्रकरणी वरिष्ठ वकिलाच्या फिर्यादीवरून त्यांच्याच ज्युनिअर वकिलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील Adv.कैलास पती किसनराव मांडे राहणार( कुलस्वामिनी नगर लातूर )हे लातूरच्या जिल्हा न्यायालयात वकील आहेत मागील 2014 मध्ये त्यांच्याकडे ज्युनिअर शिफ्ट साठी विकास साहेबराव गरड आले होते त्यांनी मांडे यांच्याकडे ज्युनिअरशिप साठी संधी देण्याची विनंती मांडे यांना केली त्यामुळे मांडे यांनी त्यांना संधी दिली सुमारे आठ वर्षे सोबत काम केल्यानंतर विकास गरड यांच्यावरील मांडे यांचा विश्वास वाढला दरम्यानच्या काळात विकास गरड यांनी अंबाजोगाई येथील स्वराज्य ट्रेनिंग कंपनी व स्वराज्य रियल इस्टेट मध्ये संस्थापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली ही कंपनी विविध मार्गाने पैशांची गुंतवणूक करून ठेवीदारांना 100 दिवसात दुप्पट रक्कम देते असे सांगण्यात येत होते.
यात पैसे गुंतवण्यासाठी विकास गरड यांनी Adv.मांडे यांना विनंती केली सुरुवातीला मांडे यांनी याकडे दुर्लक्ष केले परंतु विकास गरड यांनी मांडे यांच्या घरी सहकुटुंब येऊन पैसे गुंतवण्याची विनंती केली यामुळे मांडे यांनी सहकार्याची ऐकून वेळोवेळी विकास गरड यांच्या खात्यावर पैसे गुंतवण्यास सुरुवात केली .वर्षभरात सुमारे 30 लाख 70 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात आली त्यातील 25 लाख रुपयांची रक्कम विकास गरड यांच्याकडे बाकी आहे ती रक्कम परत देण्याची विनंती Adv.मांडे यांनी वेळोवेळी विकास गरड यांनी केली परंतु त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली कंपनी बंद पडली आहे सुरू झाल्यावर देतो अशी कारणे सांगितली तरीही म्हणजे यांनी विकास गरड यांच्याकडून थकीत रकमेपुटी 18 लाख 57 हजार दोनशे पन्नास रुपयाचा धनादेश घेतला होता त्या धनादेशाची मुदत संपेपर्यंत विकास गरड हा एडवोकेट मांडे यांना पैसे देतो असे सांगत होता परंतु धनादेशाची मुदत संपतात विकास गरड यांनी न्यायालयाच्या परिसरातच एडवोकेट मांडे यांना धारदार शस्त्र जवळ बाळगून धमकावत हाताच्या बाहुला चावा घेतला होता.
आता आपली रक्कम मिळत नाही याची खात्री झाल्याने Adv.मांडे मध्ये यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली विकास गरड त्याची पत्नी अर्चना विकास गरड, स्वराज्य कंपनीचा व्यवस्थापक ज्ञानेश्वर कुरडे त्याची पत्नी अश्विनी वर्कर रागिनी ज्ञानेश्वर कुरडे ,स्वराज्य कंपनीचा प्रमुख गणेश भिसे त्यांची पत्नी पूजा गणेश भिसे अशा सहा जनाविरोधात आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. यावरून सहाही आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 507 /24 कलम 406 420 34 3 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपी फरार आहेत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
0 Comments