तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर ते चिवरी पाटी पर्यंतचा रस्ता मार्ग दुरुस्तीसाठी वाढीव निधी मंजूर करण्यात यावा आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांची मागणी
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर ते नळदुर्ग रोडला जोडणाऱ्या चिवरी पाटी रस्त्याची प्रचंड दुरुस्त झाली असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीसाठी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी निवेदनाद्वारे दि,१२ रोजी उपविभागीय बांधकाम विभाग तुळजापूर यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांच्याकडे केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की, तुळजापूर तालुका मौजे चिवरी येतील महालक्ष्मी देवी मंदिर ते नळदुर्ग रोड पाटी पर्यंत रस्त्याचा मार्ग दुरुस्ती साठी वाढिव निधी उपलब्ध करून देण्यात यावा कारण या देवस्थानाला मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा आणि अमावास्या ला अनेक भक्त येतात आणि या मुळे या ठिकाणी चांगला कायम चा सिमेंट किंवा डांबरी रस्ता तात्काळ दुरूस्ती करणया साठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात यावे या पुर्वी दिनांक 13/12/2022 रोजी निवेदन देण्यात आले होते तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग धाराशिवचे पत्र फेब्रुवारी 2023 या रस्त्याच्या संदर्भ मला महितीस्तव कळविले होते मी पुढील महिती घेतली तर श्री महालक्ष्मी मंदिर ते नळदुर्ग रोड पाटी पर्यंत रस्त्याच्या साठी रु 40 लाख मंजूर करण्यात आले?पण पैसे अपुरे पडतात तरी या रस्त्याच्या कडेला संरक्षण करण्यासाठी वाढिव निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी धाराशिव जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर बबनराव शेळके यांच्या वतीने करण्यात येत आहे तरीही येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे म्हणून संबंधित प्रशासन अधिकारी तत्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच गट विकास अधिकारी कार्यालय तुळजापूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना मागणीची प्रत माहितीस्तव सादर करण्यात आले आहे.
0 Comments