गोहत्या करून व्हिडिओ व्हायरल केल्याच्या निषेधार्थ नळदुर्ग पोलीस ठाण्यावर हिंदू संघटनाचा धडक मोर्चा, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी
नळदुर्ग: गोहत्या करून व्हिडिओ प्रसारित केल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनाच्या वतीने नळदृग पोलिस ठाण्यावर दि,१० रोजी धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकाच्या वतीने नळदृग पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोहत्या करून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनाच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्यावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नळदृग शहरातील अंबाबाई मंदिरापासून या मोर्चास प्रारंभ करण्यात आला. माऊली नगर बस स्थानक शास्त्री चौक चावडी चौक, भवानी चौक क्रांती चौक, या मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत निघालेला हा मोर्चा नळदुर्ग पोलीस ठाण्यावर धडकला.
यावेळी मोर्चातील आंदोलकाच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले गोहत्या करून व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित दोषींवर गुन्हा नोंद करून त्याच तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली या मोर्चात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू राष्ट्र सेना, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, या संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह शेकडो हिंदू नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.
0 Comments