भीषण अपघात : तुळजापूर तालुक्यातील खंडाळापाटी नजीक भरधाव कारची दुचाकीला धडक २ जण जागीच ठार,
धाराशिव: लातूरहून भरधाव आलेल्या कारने रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली या भीषण अपघातात दुचाकी वरील दांपत्ये जागीच ठार झाले ही घटना रविवारी दि,४ रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील खंडाळा पाटी नजीक घडली दांम्पत्य तुळजापूरकडे कामानिमित्त जात होते.
बामणी येथील कालिदास महादेव गुजर वय (60)व त्यांच्या राजाभाई कालिदास गुजर हे दोघी पती-पत्नी कामानिमित्त दुचाकी वरून तुळजापूरकडे निघाले होते. त्यांची दुचाकी खंडाळा पाटीनजीक आली असता रस्ता क्रॉस करताना लातूरहून भरताव आलेल्या कारने क्रमांक एम एच 14 -kj-30 20 जोराची धडक दिली .या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली होती., एवढेच नाही तर संबंधित जागेपासून दांपत्यास कारने साधारणपणे 500 फूट दूर ओढत नेले. मयताच्या पश्चात दोन मुले दोन सुना असा परिवार आहे सायंकाळी याप्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पादत्राणे विक्रीतून उदरनिर्वाह चालवीत होते
कालिदास गुजर हे बामणी गावातच पादत्राणे विक्रीचा व्यवसाय करून उपजीविका भागवत होते तुळजापूरकडे जाताना भरधाव धडकेत गुजर दांपत्ये जागीच ठार झाले ही घटना समजतात संपूर्ण गावावर शुभ कला पसरली
0 Comments