दुर्दैवी घटना: नागपंचमी दिवशी सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू
बीड: आष्टी तालुक्यातील बीड सांगवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणगेवाडी येथील महिलेचा पहाटे झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. ही घटना नागपंचमी दिवशी घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भिवराबाई अश्रुबा गणगे वय (65) असे या महिलेचे नाव आहे ;दुर्दैवाने नागपंचमीच्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे. भिवराबाई गणगे स्वतःच्या शेतात पत्र्याच्या घरात झोपेत असताना शुक्रवारी पहाटे चारच्या दरम्यान विषारी सापाने दंश केल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबतची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिल्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भिवराबाई गणगे यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे तहसीलदारांनी शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून गणगे कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी बीड सांगवी ग्रामपंचायतचे सरपंच नंदकिशोर करांडे यांनी केली आहे त्यांच्या पश्चात पती दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments