Hot Posts

6/recent/ticker-posts

गावच्या मातीचा आभाळा एवढा माणूस- लोकनेते आर आर आबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख-R.R.Aaba Patil

गावच्या मातीचा आभाळा एवढा माणूस- लोकनेते आर आर आबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख


=======================

आर.आर.पाटील ऊर्फे आबा म्हणजे गावच्या मातीचा आभाळा एवढा माणूस.सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या अंजनी गावातुन आलेला हा गावठी माणुस पुढे मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री झाला.सारा महाराष्ट्र त्यांना आबा नावाने ओळखायचा.काॅलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातुन शरद पवारांच्या दृष्टीस पडलेला हा हिरा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु झाला.

          आबांच राहणीमान ही साध अगदी गावतल्या माणसांला शोभेल अस.पांढरी शुभ्र विजारी सारखी पॅन्ट त्यावर पांढरा शुभ्र शर्ट.तो शर्ट हाफ बाह्यांचा.पायात कोल्हापुरी चप्पल किंवा कोल्हापुरी बुट.मनगटावर कायम घडयाळ ते ही काळी पट्टी असलेल साध घडयाळ .साध राहणीमान असलेल हे नेतृत्व जनतेच्या गळ्यातल ताईत होत.उंची केवळ चार फुट सहा इंच असली तरी राजकिय व वैचारिक उंची मुळे आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले.

         आबांचे निर्णय ही त्यांच्यासारखे धडाकेबाज.बोलण ,भाषण म्हणजे तर अस्सल ग्रामिण बोलींचा ठेवा होता.ग्रामीण मराठी माणसांच्या काळजातल ते बोलत असत.म्हणुन ग्लोबल मुंबईतल्या पंचतारांकित एसी मधल्या उच्चशिक्षित पत्रकाराला ही आबां आपल्या बोलण्यामुळे घाम फोडत.आबांची मुलाखत असो की बाईट पत्रकारांना अभ्यास करावा लागत असे.आबांचा प्रत्येक विषयावर अभ्यास सखोल तितकाच प्रगल्भ ,दुरदर्शी असे.म्हणुनच शरद पवार सारख्या केंद्रिय नेतृत्वाचा सर्वांत जास्त जवळचा विश्वासु माणुस आबा होते.

            "कोपरापासुन ढोपरापर्यत सोलुन काढेन"अशा सारख्या वाक्याने त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला शिस्त,स्वाभिमान,पारदर्शीपणा आणला.गृहमंत्री असताना पोलिस दलाला शिस्त तर आणली पण पोलिस भरती ही प्रचंड पारदर्शी केली.गेल्या दोन दशकांत गोरगरिबांच्या झोपड्डीतील मुले आपल्या क्षमतेने आणि गुणवत्तेमुळे पोलिसदलात भरती झाले.त्या भरती पारदर्शी करण्यामध्ये आबांची मेहनत होती.पोलिसदलातील अनेक निर्णय घेवुन सर्वोत्तकृष्ठ पोलिसदल करण्याचे काम आबांनी केले.त्यामुळे पोलिसदलात अनेक गरिबांची मुले पारदर्शीपणांमुळे भरती झाले याचे सारे श्रेय आबांना द्यावे लागते.

          डान्सबार बंदी हा एक आबांचा गृहमंत्री असताना चा निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरला.पण आबा कोणालाच वदले नाहीत.पक्षातुन ही प्रचंड दबाब असताना ते निर्णयावर ठाम राहिले.कित्येक नेते,पुढारी, दलाल,दोन नंबर वाले, अंडरवर्ल्डवाले यांचे डान्सबार महाराष्ट्रभर चालतात.या बंदी मुळे अब्जावधी कमाविणारे बेकार झाले.हा निर्णय शेवटी न्यायालयात गेला.तरीही आबांची तळमळ,शुध्द हेतु,प्रामाणिकपणा यामुळे न्यायालयासुध्दा निर्णय देताना अनेक कांगोरे विचारात घ्यावे लागले होते.आबां एवढ्यावर थांबले नाहीत तर डान्सबार बंदी नंतर बारबालांचे पुर्नवसन करण्यासाठी लघुईद्योग,कटिरद्योग काढुन आश्रमशाळा काढुन त्यात त्यांना प्रशिक्षित केले.दारुबंदी चा निर्णय त्यांना घेता आला नाही.हे शल्य त्यांना कायम  बोचत राहिले.

         ग्रामीण महाराष्ट्रासाठी "ग्रामीण तंटामुक्त योजना" ही त्यांनी काढला.तंटे गावात मिटायला हवेत,न्यायालयीन खर्च वाचव्याला हवा.दिवाणी,महसुली आणि काही मोजके गंभीर नसलेले पण किरकोळ फौजदारी खटले गावात मिटायला  हवेत ही त्यांची भुमिका होती.त्यामुळे महाराष्ट्राचा वेळ,पैसा,श्रम वाचला.न्यायलयावरचा ताण प्रचंड कमी झाला.लोकांचा कोर्टकचेरिचा खर्च,पिढ्यानंपिढ्यांच खटले निकाले काढले गेले.गावात सौदर्ह,सहिष्णुता,एकता ही वाढली.ही योजना आज केंद्रशासनाने महाराष्ट्र सरकाने ही कायम ठेवली आहे.आबांचा हा निर्णय किती दुरदर्शी होता हे स्पष्ट होते.

       "संत गाडगे बाबा ग्रामीण स्वच्छता अभियान"सारखी योजना ही आबांनी महाराष्ट्रात राबली.त्यासाठी रोख पारितोषिके,सन्मानचिन्हे ठेवुन राष्ट्रीय पातळीवर गावांना गौरविण्यात आले.ही योजना आज केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने ही कायम चालु ठेवली.आज आबांची आठवण यासाठी येते.

       आबांचा प्रामाणिकपणा,साधी राहणी,साध बोलण ,अस्सल ग्रामिण शैलीतली भाषण ,ग्रामिण भागांचा अभ्यास ,राजिकय निर्णयक्षमता,कर्तृत्व,नेतृत्व,आणि अमोघ वक्तृत्व यामुळे ते लोकप्रिय ठरले.आबां गृहमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणुन त्यांनी स्वःताहुन जबाबदारी स्विकारली.तिथे पोलिस दलात धडाकेबाज निर्णय घेतले.नक्षलवाद्यांना ही आत्मसमर्पन सारखी योजना आणुन कित्येक नक्षलवाद्यांना माणसांत आणुन त्यांचे पुनर्वसन आबांनी केले.

      आबांची उंची लहान असली तरी कर्तृत्व आभाळाएवढे महान होते.म्हणुन मुंबइवर दशहतवादी हल्ला झाला तेंव्हा ,"बडी बडी शहरो में ऐसी छोटी छोटी घटना होती है" या वाक्याचा माध्यमांनी व विरोधकांनी  विपर्यास केला .तेंव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला.पण आबां प्रांजळ मनाचे होते.त्यांनी राजीनामा लगेच सादर केला.त्यापुढे जावुन आपले सामान घेवुन ते आपल्या गावी अंजनी कडे साधा एसटी बसने जाण्यासाठी निघाले.मंत्री पदावरुन पायउतार झाल्यावर सरकारी बंगला रिकामे न करणारे हजारो मंत्री महाराष्ट्राने पाहिले आहेत.दादागिरी करुन ते तसेच सरकारी बंगल्यावर पद जाऊन ही राज्य करतात.पण आबांचा विचार महाराष्ट्राला  आर्दश घालुन देणारा ठरला.पदावरुन पायउतार होताच सरकारी बंगला खाली करणारे आबा एकमेव असतील.मंत्री,गृहमंत्री,उपमुख्यमंत्री पद गेले तरी गावाकडे जाताना त्यांच्याकडे साधी कातड्यांची बॅग ,एक सुटकेस आणि त्यात बरीशी पुस्तके दोन तीन साधे पांढरे ड्रेस ही आबांची मालमत्ता होती.

         गावाकडे आले की आबा शेतात जात.आई ,पत्नी,मुले,गावाकडील मणासांत ते रमत.त्यांना वेळ देत.गावाकडील समस्या सोडवत.साधी राहणी तसे जेवण ही साधच करत.झुणकाभाकर ही आबांची आवडती डिश होती.एवढा प्रामाणिक पणामुळे आबां राजकारतात आदर्श ठरले

      आपल्या वर्तनामुळे आबांनी राजकारणांला आदर्श घालुन दिला.आबा राजकारणातील संतच म्हणायला हवे,आजकाल साधा सरपंच झाला तरी नेते दादागिरी करतात.स्क्रापिओ,पिजोरो,असल्या गाड्या वापरतात.साधे गावातील सरपंच पाच पाच मजली करोडांच्या इमारती बांधतात तेंव्हा आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.आबांचा स्वःताचा बंगला होता ना गाडी.एसटीबस ने प्रवास करणारे,गावी मातीच्या वाड्यात राहणारे आबा महाराष्ट्राच्या सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व करत होते.

       आबाना २०१५ साली मात्र कर्करोगाने गाठले.त्यात आबांचा मृत्यु झाला.सर्व समस्यावर मात करणारे आबा मृत्युवर मात्र मात करु शकले नाहीत.पण मृत्युला ही रडू कोसळले असेल, कारण एवढा सुर्‍हदयी माणुस आणि प्रामाणिक राजकारणी यांना घेवुन जाताना मृत्यु ही रडला  नक्कीच असेल.

       अशा राजकारणातील प्राजंळ ,निर्मळ आणि गावाकडच्या आभाळाएवढ्या देव माणसांस विनम्र अभिवादन!आबांना विनम्र आदरांजली!


=================================

श्री.पंकज रा.कासार काटकर

मु.पो.काटी.ता.तुळजापुर

जि.धाराशिव

मो.नं.÷९७६४५६१८८१

Post a Comment

0 Comments