Hot Posts

6/recent/ticker-posts

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात आज सर्व ओपीडी बंद अत्यावश्यक सेवा राहणार सुरू दोन लाख डॉक्टर घेणार संपात सहभाग-Kolkata doctor matter service opd

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात आज सर्व ओपीडी बंद अत्यावश्यक सेवा राहणार सुरू दोन लाख डॉक्टर घेणार संपात सहभाग-


मुंबई: कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी सुरू केलेल्या संपात वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि बंदपत्रीत डॉक्टरांच्या सहभागाने आरोग्य यंत्रणा कोलमडली त्यातच आता राज्यातील पूर्ण एक दिवस राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयुष अंतर्गत येणाऱ्या जवळपास दोन लाख डॉक्टरांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ओपीडी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याने आरोग्यसेवा ठप्प होणार आहे. यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होणार आहेत.

कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर डॉक्टरमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई सह राज्यात मंगळवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स आणि महापालिका मार्डच्या  संपात राज्यातील बंदपत्रीत वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि सहभागी झाले आहेत त्यामुळे रुग्णालयातील ओपीडीचा भार विभाग प्रमुख सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक व इतर प्राध्यापकावर पडला आहे.

राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आयुष अंतर्गत येणाऱ्या राज्यातील जवळपास दोन लाख डॉक्टर शनिवारी पहाटे सहा वाजल्यापासून रविवारी सहा वाजेपर्यंत राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत यामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प होणार आहे.

शासकीय निमशासकीय कार्यालयात सुरक्षा रक्षक असतात मात्र रुग्णालयाच्या आवारात सुरक्षारक्षक नेमणूक केली जात नाही निवासी डॉक्टरांकडून 36 तास काम करून घेतात पण या डॉक्टरांना विश्रांतीसाठी ड्युटी रूम दिल्या जात नाहीत यामुळे डॉक्टरांच्या मागण्याकडे काय दुर्लक्ष केली जात असल्याचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर शिवकुमार उत्तरे यांनी सांगितले.

आझाद मैदानातून सीपीएची मागणी

शुक्रवारी मार्डचे शेकडो डॉक्टर आझाद मैदानावर जमले होते निदर्शनाद्वारे मार्डच्या डॉक्टरांनी सरकारकडे केंद्रीय संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली. सुरक्षत अभाव अपुरी वस्तीग्रह आणि इतर समस्या ही डॉक्टरांनी नमूद केल्या सीपीए वर निर्णय होणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे मार्डच्या प्रतिनिधींनी  सांगितले.

Post a Comment

0 Comments