तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न
===================================
तुळजापुर दि.१: तालुक्यातील काठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल दि.३१ रोजी मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाली.या सहलीसाठी शाळेतील शिक्षक श्री.पंकज कासार काटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शैक्षणिक सहलीमध्ये येडशी येथील रामलिंग मंदिर,हातलाई देवी डोंगर,धारासुरमर्दिनी देवी मंदिर,वडगाव (सिध्देश्वर),मृदग्लेश्वर मंदिर सिंदफळ येथे सहल काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला...मौज,मस्ती,धमाल,सोबत निसर्गांचा रंग बेरंगी नजारा त्यांनी अनुभवला,देवदर्शन सोबत पर्यटन त्यांनी अनुभवले.हा अनुभव निश्चितःच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आणि जीवनात शिकण्यासाठी साथ देणारा ठरेल.या सहलीत शाळेचे मुख्याध्यापक श्री.सत्यवान रसाळ सरजी व सहशिक्षक श्री.पंकज कासार काटकर सर यांनी सहभाग घेतला.
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील रामलिंग मंदिरा शेजारील धबधब्यामध्ये विद्यार्थी मनमुराद आनंद लुटताना टिपलेली दृश्य
0 Comments