Hot Posts

6/recent/ticker-posts

हवामान विषयक: सप्टेंबर मध्ये जोरदार बरसणार पाऊस ! भारतीय हवामान विभागाचा अंदाज- राज्यात या ठिकाणी येलो अलर्ट

हवामान विषयक: सप्टेंबर मध्ये जोरदार बरसणार पाऊस ! भारतीय हवामान विभागाचा अंदाज- राज्यात या ठिकाणी येलो अलर्ट

नवी दिल्ली: ऑगस्ट महिन्यात देशात सामान्य च्या 16% अधिक पाऊस झाल्याचे हवामान खात्याने शनिवारी सांगितले त्याचवेळी सप्टेंबर महिन्यातील सामान्य पेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर ठेवला आहे त्यामुळे हंगामातील अखेरच्या महिन्यात देखील वरून राजा जोरदार बसून सुरुवातीच्या दोन महिन्यातील तूट भरून काढणार असल्याचे दिसते. ऑगस्ट महिन्यात 248.1 मीमी पाऊस पडला तर तो सामान्य मानला जातो यंदाच्या गोष्ट मध्ये 287.1मीमी पावसाची नोंद झाल्याचे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले यंदाच्या मान्सूनच्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यात 749 मिनी पावसाची नोंद झाली .सहसा या कालावधीत 701 मिमी पाऊस होतो सामान्य पेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी केरळ आणि विदर्भास ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातील सामान्य पेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रामुख्याने उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर राजस्थान आणि मध्य प्रदेशात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

राज्यात काही भागात पाऊस सक्रिय

पुणे राज्यात पाऊस खरी होत असून शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी राज्याच्या काही भागात पाऊस पडला आहे दरम्यान आगामी पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडणार असून काही भागात याला अलर्ट असून जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

येत्या 5 दिवसात राज्यात परतीच पाऊस धडाडणार*

1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज काय म्हणतो?

IMD च्या अंदाजानुसार, उद्या सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विदर्भ विभागात मुसळधार ते तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या आठवड्यात पश्चिम आणि मध्य भारतातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे.

एक आणि दोन सप्टेंबरला पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.

उद्या विदर्भातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार?

आय एम डी ने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांना एक ते चार सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.


दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन आणि चार सप्टेंबर रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी 4 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट जारी झाला आहे

Post a Comment

0 Comments