मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वयाची अट चाळीस वर्ष करा - आपचे मधुकर शेळके यांची मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
_______ _____________ _____
धाराशिव - आम आदमी पार्टीचे धारशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री . मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उमेदवारांची वयाची अट चाळीस वर्ष करण्यात यावे मागणीचे निवेदन मा .मुख्यमंत्री साहेबांना तहसिलदार तुळजापूर मार्फत आज दिले .
सदरील निवेदनामध्ये त्यांनी या यांजनेअंतर्गत उमेदवाराची वयाची अट 18 ते 35 असून त्या मध्ये सुधारणा करून कृपया 40 वर्षापर्यंत वयाच्या अटीत वाढ करण्यात यावी व सुधारीत पत्रक काढण्यात यावे विनंती केली आहे .वयाची अट वाढवल्यास त्यांचा फायदा ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहेत जे अत्यंत इच्छुक गरजु आहेत त्यांना होईल .
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणा अंतर्गत कृपया वयाची अट 18 ते 35 ऐवजी 18 ते 40 वर्ष करण्यात यावी जेणेकरून त्या उमेदवारांना प्रशिक्षण कार्यामध्ये सहा महिन्यासाठी समावेश करून घ्यावे कारण कोरोना कालावधी मध्ये प्रत्येक गरजु होतकरू उमेदवाराचे तीन वर्ष वाया गेलेले आहेत . त्यामुळे शासनाने सदरील बाबीचा विचार करावा व वयाची अट 18 ते 40 वर्ष करून उमेदवारांना न्याय द्यावा .
सदय परिस्थितीत सदरील उमेदवारांना मुख्यमंत्री कार्यशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत वयाची अट 35 असल्याकारणाने लाभ घेता येत नाही ज्याचे वय 35 ते 40 झाले आहे अश्या इच्छुक बेरोजगार उमेदवार डावलला जात आहे .
सध्याबेरोजगारी वाढलेली आहे सदरील सर्व सुशिक्षीत बेरोजगार शहरी व ग्रामीण उमेदवारांना वय वाढल्यामुळे इच्छा असून सुद्धा लाभ घेता येत नाही . उमेदवारावर घर प्रपंच जवाबदारी वाढली आहे .त्यामुळे आम्ही आपणास सदरील निवेदनाद्वारे नम्र पुर्वक विनंती करतो कि कृपया त्वरीत , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत निवडसाठी उमेदवारांची वयाची अट वाढ करून 18 ते 40 वर्ष करण्यात यावी अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आली आहे .
आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री . मधुकर शेळके यांनी धाराशिव जिल्ह्यात शिक्षण आरोग्य रस्ते स्वच्छता इ . बाबतीत नेहमीच आवाज उठवले आहे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात डायलेसीस केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांचे कारखान्यात अडकलेली प्रलंबीत बीले, रस्ते , शहर स्वच्छता, जिल्ह्यातील शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे या करिता निवेदन वेळप्रसंगी आंदोलने केली आहेत य त्याच प्रमाणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात तरी सदरील निवेदनावर मा . मुख्यमंत्री मोहदय योग्य निर्णय घेतील व उमेदवाराची वय मर्यादा वाढवून चाळीस वर्ष करण्याबाबत काय निर्णय घेतात याबाबत सर्वाचे लक्ष लागून आहे
0 Comments