घरोघरी सोनपावलांनी गौराईचे आज उत्साहात आगमन; चैतन्यदायी वातावरण
धाराशिव : गणरायापाठोपाठ मंगळवारी(दि.१०) सोनपावलांनी गौरींचे आगमन झाले. घरोघरी मंगलमय वातावरणात, उत्साहाने गौरीचे स्वागत करण्यात आले. गौरींच्या देखाव्याची सजावट, फराळाचे पदार्थ करण्यात महिला दिवसभर मग्न असल्याचे दिसून आले. दरम्यान, बुधवारी(दि. ११) गौरीपूजन होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हटले जाते. महालक्ष्मींचा हा सण तीन दिवस घरोघरी साजरा होणार आहे. शनिवारीा गिौरींचे आगमन झाले असून दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी(दि. ११) रोजी गौरीपूजन होणार आहे तर तिसऱ्या दिवशी गुरुवारी(दि.१२) भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी-महालक्ष्मींचे विसर्जन होईल. काहींच्या घरी फोटोतल्या, मुखवट्याच्या, उभ्या, सुगडाच्या, खड्याच्या तर काहींच्या घरी मातीच्या मुखवट्याच्या महालक्ष्मी असतात.
प्रथेप्रमाणे त्यांची स्थापना, पूजन व विसर्जन केले जाते.गौरींच्या पूजनासाठी सोळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखविला जात असल्याने बाजारात या भाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. तीन दिवस अगदी आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात मंगळवारी दिवसभर खरेदीसाठी गर्दी झाली होती.नैवेद्याचे नानाप्रकारगौरी पूजन उत्सवात दुसºया दिवशी गौरीला नानाविध फळे व पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. कुलपरंपरेनुसार व रीतीरिवाजानुसार यात फरक दिसून येतो. काही ठिकाणी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो.
गौरीच्या नैवेद्यासाठी बनविण्यात येणारे विविध प्रकारचे लाडू, करंज्या, पुºया, सांजोºया, बर्फी आदी तयार करण्यासाठी गृहिणींची आठवडाभरापासून लगबग सुरू असते.त्याचबरोबर नैवेद्याला पुरणपोळी, खीर आणि सोळा भाज्या, कढी असा बेत असतो. कोकणात नारळाच्या करंजीला महत्त्वाचे स्थान असते. कोकणस्थामध्ये गौरी घावण घाटलं जेवते. तर काही ठिकाणी दही-दुधाचा नैवेद्य दाखवितात.
0 Comments