Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजनक : नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना

 संतापजनक : नऊ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार धाराशिव जिल्ह्यातील घटना


धाराशिव:  किराणा दुकानात खाण्यासाठी कुरकुरे घेण्यासाठी आलेल्या ९ वर्षीय बालीकेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरात घडली आहे. या, घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  ही घटना दि.१६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली  सविस्तर माहिती अशी की, शहरातील एक 9 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 16.09.2024 रोजी 17.00 वा.सु. ही किराणा दुकानात कुरकुरे आणण्यासाठी गेली असता गावातील एका तरुणाचे तिस घरात बोलावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली,अशा मजकुराच्या पिडीतेची आईने दि. 17.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन  भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(i), 65(2), 75(1), 351(2) सह कलम 4, 8,10,12 बाल लैंगिक अत्याचार अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments