धाराशिव: शेतातील सोयाबीन काड लंपास करून एकास मारहाण केली ही घटना भूम तालुक्यातील घाटनांदुर येथे घडली. या प्रकरणी 10 जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहॆ. याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की घाटनांदुर येथील अमर वसंत लवटे ,विलास सुखदेव लवटे, वसंत सोनाजी लवटे, सुखदेव सोनाजी लवटे ,छाया विलास लवटे, ताई खंडू लवटे, उषा वसंत लवटे, आरती महावीर लवटे ,खंडू सुखदेव लवटे,शिलावती सुखदेव लवटे यांनी फिर्यादी अनंत दत्तात्रय लवटे वय (40) यांनी शेतातील सोयाबीनचे काढून ठेवलेले सोयाबीन काड पिकअप मध्ये भरून लंपास केले. वडिलांना मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून त्यांनी शिविगाळ करून लाथाबुख्या लोखंडी कत्ती व काठीने मारहाण करून जखमी केली तसेच फिर्यादीची वडील नारायण वाघमारे व चुलत भाऊ राजेश भागवत वाघमारे यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी लवटे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments