Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव :श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 'स्वीप' अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन



धाराशिव :आगामी काळात होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून देणे, मतदानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच मतदार जागृतीसाठी श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे दिनांक २५ सप्टेंबर रोजी  'स्वीप २०२४' कार्यक्रमांतर्गत एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या निबंध स्पर्धेसाठी 'लोकशाहीतला राजा - मतदार', 'लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान', 'मतदान - आपले कर्तव्य', 'निवडणुका आणि मतदान', 'निवडणूक व मतदाराची जवाबदारी' इत्यादी विषय ठेवण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

या स्पर्धेसाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा विद्यालयातील शिक्षक श्री. डी. वाय. घोडके सर, श्री. के. बी. मोहिते सर, श्री. एस. एम. गोरे सर,  सौ. एस. एल. जाधव मॅडम आदींच्या उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले.

Post a Comment

0 Comments