Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात पहिल्याच दिवशी ४ विधानसभा मतदारसंघासाठी ९९ व्यक्तींनी केली २१४ अर्जाची खरेदीएकाही उमेदवाराचा अर्ज दाखल नाही


धाराशिव दि.२२: जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये २४० - उमरगा,२४१ - तुळजापूर,२४२ - उस्मानाबाद आणि २४३ -परंडा विधानसभा मतदारसंघ येतात.आज मंगळवारी २२ ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही.

आज २२ ऑक्टोबर रोजी ९९ इच्छूक उमेदवारांनी २१४ अर्ज खरेदी केले. यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी १९ व्यक्तींनी ३५ अर्ज,तुळजापूर मतदारसंघासाठी २८ व्यक्तींनी ७३ अर्ज,उस्मानाबाद मतदारसंघासाठी २७ व्यक्तींनी ५२ अर्ज आणि परंडा विधानसभा मतदारसंघासाठी २५ व्यक्तींनी ५४ अर्जाची खरेदी केली.

निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे

अधिसूचना जाहीर  करणे -२२ ऑक्टोबर, नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख - २९ ऑक्टोबर,नामांकनाची छाननी -३० ऑक्टोबर,नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख - ४ नोव्हेंबर, मतदान तारीख - २० नोव्हेंबर आणि मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

Post a Comment

0 Comments