Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्षाकडून शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी हजारो समर्थकासह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल


तुळजापूर: तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करीत मंगळवारी दिनांक 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी अण्णासाहेब दराडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करून हजारो समर्थकासह शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्ज दाखल करतेवेळी विशेष म्हणजे त्यांनी आपल्या आई वडील व पत्नी यांच्यासमवेत अर्ज दाखल केला आहे. ही रॅली नळदुर्ग रस्ता ,भवानी रस्ता ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जुने बस स्थानक मार्गे रॅली शक्ती प्रदर्शन करीत येथील लोहिया मंगल  कार्यालयात रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत तुळजापूर मतदारसंघातील हजारो समर्थक उत्साहात सहभागी झाले होते अण्णासाहेब दराडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

अर्ज दाखल करून आल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेतकरी पुत्र दराडे म्हणाले की तुळजापूर मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नाची जाण आहे  हे प्रश्न सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून आपण विकासाचा अजेंडा घेऊन मायबाप मतदारांना मते मागणार आहोत असे ते म्हणाले. तसेच त्यांनी प्रथम प्राधान्य सर्वसामान्यांच्या पोरा बाळांना चांगले शिक्षण मिळावे व ते स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे,  बाळासाहेब कसबे जिल्हा संघटक, महेश माळी जिल्हा उपाध्यक्ष ,महादेव चोपदार जिल्हा सचिव ,बाळासाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष आदी सर्व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, मतदारसंघातील हजारो दराडे समर्थक उपस्थित होते.


शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज मंगळवार दि. 29 रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.


बातमी व जाहिरातसाठी संपर्क 
राजगुरू साखरे मो.9881298946
बिभिषन मिटकरी मो.9075834766

Post a Comment

0 Comments