चिवरी /शञुघ्न बिराजदार : तुळजापूर तालुक्यातील चिवरी व परिसरात दि,२ व ३ रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांससह खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ठीक ठिकाणी शेतात तळे साचले असून पिके पाण्यात आहेत तर काढून ठेवलेले सोयाबीनचे काड भिजल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांना होत आहे. चिवरी व परिसरात बुधवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. दिवसभर चांगले ऊन पडले होते, मात्र सायंकाळी सहाच्या नंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले त्यामध्ये काढणीस आलेल्या सोयाबीन पिकासह खरीपातील अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवातुन होत आहे.
0 Comments