तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे नवरात्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून प्रत्येक वर्षी तुळजापूर ते नळदृग, तसेच तुळजापूर ते मंगरूळ ईटकळ या रस्त्यावरील साईड पट्ट्यावरील उगवलेले गवत झाडे झुडपे काढली जातात परंतु यावर्षी संबंधित विभागास याचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नळदृग ते तुळजापूर हा रस्ता महत्त्वाचा असून यावरून कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा येथून हजारो भाविक नवरात्र उत्सवात पायी चालत तसेच वाहनाने देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे तुळजापूर ते ईटकळ आणि नळदुर्ग ते तुळजापूर या मार्गाचा भाविक मोठ्या प्रमाणात अवलंब करतात तसेच नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमेला सोलापूर ते तुळजापूर हा मार्ग वाहनांना बंद करून ती वाहतूक मंगरूळ मार्गे वळवली जाते यामुळे साईट पट्ट्यावरील व रस्त्याच्या बाजूची गवत काढणे आवश्यक आहे. यामुळे भाविकांना रस्त्याच्या कडेने चालणे सोयीस्कर होते. सद्यस्थितीत या मार्गावर प्रचंड प्रमाणात गवत व झाडेझुडपे वाढलेली दिसत आहेत यामुळे तात्काळ याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याची साफसफाई करून घ्यावी व भविष्यात भाविकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी भावीकांतुन होत आहे.
अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडे रत्याच्या कडेला आलेली आहेत.यामुळे भाविकांना मुख्य रस्त्यावरुन चालावे लागते.त्यामुळे मागील नवरात्र उत्सव काळात अनेक वेळा भाविकांचा अपघात झालेला आहे.सोबतच या महामार्गावरील मोठ्या प्रमाणावर वळणे आहेत.या वळणावरती मोठे गवत व झुडपे वाढल्याने समोरून येणारी वाहने चालकांना दिसत नाहीत किंवा पायी चालत येणारे भाविक दिसत नाहीत त्यामुळे पण अपघात झाले आहेत.पुढील काळात हा अनर्थ टाळण्यासाठी हे गवत व झाडे काढणे गरजेचे आहे.
नळदुर्ग - तुळजापूर या रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत व वाढलेली झाडे व झुडपे काढून साईड पट्टी मोकळी करावी.जेणेकरून आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांना चालत जाणे सुखकर होईल.आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा हा मार्ग सुकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे गवत काढून पायी चालत जाण्यासाठी साईड पट्टी मोकळे करून देणे गरजेचे आहे.अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
0 Comments