नळदुर्ग -तुळजापूर रोडवर नळदुर्ग नजीक कार व टमटमचा भीषण अपघात १ ठार आठ जखमी
धाराशिव- : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील कचरा डेपो जवळ मंगळवारी दिनांक 8 रोजी कार (KA-03HR0441)आणि टमटमचा(MH-25-M676 )समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात एक ठार तर 8 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातील कारमधील प्रवासी हे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन बिदर कडे जात होते तर टमटम मधील मधील प्रवासी हे जेवळी येथील असून ते श्री चिवरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत होते. या अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालय व सोलापुर येथे दाखल करण्यात आले आहे.
0 Comments