सोलापूर: रॉंग साईडने निघालेल्या कार आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेखास पाच जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्घटना पुणे पंढरपूर या पालखी मार्गावरील नातेपुते जवळील कारुंडे तालुका माळशिरस येथे रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या अपघातात राजेश अनिल शहा वय (55) राहणार जंक्शन तालुका इंदापूर दुर्गेश शंकर घोरपडे वय (28) लासुरने तालुका इंदापूर कोमल विशाल काळे वय (32) शिवराज विशाल काळे वैदः आकाशी दादा लोंढे वय (25) हे जागेची ठार झाले. तर अश्विनी दुर्गेश घोरपडे व (24 )व पल्लवी पाटील वय (23) राहणार वालचंद नगर हे जखमी झाली आहेत. अपघात एवढा भीषण होता की टेम्पो खाली कार चक्काचूर झाली होती घटनेची माहिती मिळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परागणे व पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्याला सुरुवात केली जखमींना तात्काळ अकलूज येथील उपचारासाठी दाखल केले याबाबत दुर्गेश मोतीराम घोरपडे वय 35 यांच्या फिर्यादीवरून कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नातेपुते पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पर्यटनाचा होता बेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लासुरने तालुका इंदापूर येथील कॉन्ट्रॅक्टर राजेश आहे कारने एम एच बी 40 5 64 आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कास पठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून रॉंग साईडने निघाले होते नातेपुते येथून आठ किलोमीटर किलोमीटर अंतरावर काढून दे तालुका माळशिरस येथील पुलावर समोरून येणाऱ्या टेम्पो एमएच ४२ ए क्यू 33 92 आणि कार मध्ये भीषण अपघात झाला जखमींना अकलूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली आहे.
पती ठार पत्नी जखमी
दुर्गेश घोरपडे यांचे चार महिन्यापूर्वीची लग्न झाले होते अपघातात त्यांचा मृत्यू झाला तर दुर्गेश यांची पत्नी अश्विनी या गंभीर जखमी झाले आहेत शिवाय कोमल काळी व त्यांचा दहा वर्षाचा मुलगा शिवराज काळे या मायलेकाचा ही मृत्यू झाल्याने हळूहळू व्यक्त होत आहे.
दिशादर्शक फलक दिसत नसल्याने अपघात
नातेपुते येथून महामार्गावर जाताना फलक दिसत नाही तर काही चुकीचे फलक लावले आहेत तर काही ठिकाणी फलकच नसल्यामुळे चुकीच्या मार्गाने वाहने सुसाट जात असतात यामुळे शिंगणापूर पाटी येथे दिसतील असे मोठे फलक लावणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
0 Comments