पक्ष निष्ठेच्या बळावर महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताने नक्की विजयी होणार: आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके
नळदुर्ग येथे आम आदमीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
तुळजापूर : विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ नळदृग येथे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार एडवोकेट धीरज पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शेळके यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास आमचा जाहीर पाठिंबा घोषित करून आम्ही गाव भेट दौरे करत आहोत. या गाव भेट दौऱ्याच्या प्रचारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की विजय होणार असल्याचे सांगितले, त्याचबरोबर त्यांनी कुलदीप धीरज पाटील कदम यांच्या विरोधकाकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले, महाविकास आघाडीचा उमेदवार धीरज पाटील कदम हा मॅनेज उमेदवार नसून तो पक्ष निष्ठेच्या बळावर उभा राहिला आहे मॅनेजर हा केवळ विरोधकाकडून होत असलेल्या अफवा आहे हा आरोप आम्ही फेटाळून लावतो असा खुलासा केला. वातावरण चांगला आहे गाव भेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे पक्ष निष्ठेच्या बळावर महाविकास आघाडीच उमेदवार धीरज पाटील हे प्रचंड मतांनी निवडून येतील येणाऱ्या 23 तारखेला त्यांना गुलाल लागलेला दिसेल असे बोलताना श्री शेळके यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वशिम पठाण ,शहर धाराशिव बिलाल रझवी आम आदमी पक्षाचे तुळजापूर शहर अध्यक्ष श्री किरण यादव सचिव विकास घोडके रोहित शेडगे,आदी सह तालुक्यातील आम आदमी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments