श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये जगदंबा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने व्याख्यान आयोजित संपन्न
धाराशिव प्रतिनिधी : येथील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे जगदंबा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री. बी. जी. जाधव यांची उपस्थिती लाभली. श्री. बी. जी. जाधव हे विद्यालयाचे संचालक व माजी उपमुख्याध्यापक आहेत. त्यांनी गुरुवर्य कै. के. टी. पाटील सर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्या समवेत सामाजिक व शैक्षणिक कार्य केलेले आहे. समाजाचे ऋण म्हणून श्री. बी. जी. जाधव व समवेत त्यांचे सुपुत्र डॉ. रत्नदीप जाधव यांनी पुणे येथे जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून मराठवाड्यातील व ग्रामीण भागातील गरीब, अनाथ, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचा आर्थिक भार उचलला जातो. जसे की विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस भरणे, वस्तीगृहाचा, मेसचा खर्च उचलणे वगैरे. या ट्रस्टने विद्यालयातील कुमारी प्राची जाधव व ओम जाधव या दोन विद्यार्थ्यांचा आर्थिक भार उचललेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जाधव यांनी या ट्रस्ट विषयी माहिती सांगितली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या संस्थेच्या सरचिटणीस सर्व प्रेमाताई पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की गरीब असणे हा काही गुन्हा नाही, गरीब असून हुशार असाल तर पैसावाचून कुणाचं काही आडत नाही, आमच्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत केली जाते, त्यांची फीस माफ केली जाते, तसेच अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व देखील घेतले जाते असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर व उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्री. बी. जी. जाधव यांच्या पत्नी सौ. वनमाला जाधव, मुलगी विनाताई पाटील, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे यांची खास उपस्थिती लाभली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments