Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकरी पुत्राच्या आंदोलनाला यश, आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अवघ्या तीन तासात डीपीचे काम पुर्ण

शेतकरी पुत्राच्या आंदोलनाला यश, आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अवघ्या तीन तासात डीपीचे काम पुर्ण


तुळजापुर / राजगुरू साखरे: तुळजापूर तालुक्यातील हगलूर शिवारातील विद्युत डीपी चे काम मागील आठ महिन्यापासून प्रलंबित होते, येथील 17 शेतकऱ्यांनी प्रत्येकी तीन हजार प्रमाणे 51 हजार रुपये महावितरणच्या  अधिकाऱ्याला डीपी मंजूर करण्यासाठी दिले होते. डीपी मंजुरही करण्यात आला होता.दरम्यानच्या काळात पैसे घेतलेला कर्मचारी बदली होऊन गेला त्या ठिकाणी दुसरा रुजू झाला मात्र शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांना मला पैसे मिळाले नाहीत डीपीला जोडणी करण्यासाठी अजून वीस हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले . म्हणून डीपी सुरू करण्यासाठी महावितरणचे अधिकारी टाळाटाळ करत होते यामुळे परिसरातील शेतकरी वैतागले  होती दरम्यान शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी दिनांक 21 रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यारी, यांना लेखी निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानंतर त्याने डीपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करत तात्काळ विद्युत डीपी सुरळीत करण्यात यावा अन्यथा आत्मदहन करणार असल्याचे सांगितले. या आंदोलनाची दखल घेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या तीन तासात विद्युत डीपी जोडणी करून सुरळीत चालू करण्यात आला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न मिटला आहे त्यामुळे शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांचे आभार मानत शेतकऱ्यातून समाधान व्यक्त आहे . 

Post a Comment

0 Comments