तुळजापूर २४१ विधानसभा मतदारसंघातील मतदान केलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार: शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे
तुळजापूर: तुळजापूर 241 विधानसभा मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र श्री अण्णासाहेब दराडे यांनी सर्व मतदार बंधू भगिनी मतदानाचा हक्क बजावला त्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी कमी असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात घालण्याचे काम ते लोक करत असल्याचे वाटते, जे आज मनापासून आपले कर्तव्य म्हणून मतदान केले त्यांचे विशेष करून आभार मानतो त्याचबरोबर ज्या लोकांनी पैशासाठी मटणासाठी दारूसाठी जातीसाठी धर्मासाठी कोणते ना कोणते उद्दिष्ट ठेवून मतदान केले त्यांचेही आभार मानतो असे म्हणाले शेवटी त्यांनी मी उद्यापासून जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे जनतेचा सेवक म्हणून काम करणार आहे. आपली जी काही कामे आहेत ती हक्काने मला सांगु शकता व मीही सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या मो.9834771588 या नंबर वर संपर्क करू शकता असे शेतकरी पुत्र श्री अण्णासाहेब दराडे यांनी म्हटले.
0 Comments