ना विकलो, ना झुकलो, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे लढलो
उद्यापासून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सज्ज - शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे
तुळजापूर : यश किंवा अपयशाची कोणतीही तमा न बाळगता, होणाऱ्या परिणामाची चिंता नं करता, विधानसभा लढवण्यासाठी आवश्यक असणारे कोणतही मनुष्यबळ नसताना, आर्थिक पाठबळ किंवा कोणाच्याही वरदहस्ताशिवाय, फक्त मुठभर जिवाभावाच्या मित्रांच्या सहकार्याने , साथीने हा लढा उभारला गेला. गोरगरीबांच्या पोराना चांगल शिक्षण मिळावे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाव, सरकारी दवाखान्यात चांगले उपचार मिळावे, सरकारी कार्यालयात सामान्य जनतेची काम विना अडथळा व पिळवणुकीशिवाय तसेच स्वाभिमानाने व्हावी, शेतकऱ्यांचा स्वास म्हणजे त्यांची शेती व पिके, त्यासाठी वीज, पाणी, भाव यासाठी लढता याव , प्रश्र्न मार्गी लावता यावेत, भ्रष्ठाचार मुक्त तालुका करून होणारी विकासकामे विना टक्केवारीची दर्जेदार व्हावीत, शेतरस्त्याचे प्रश्र्न मिटावे, सर्व जातीधर्मीयांसाठी स्मशनभूमी/ कब्रस्थान व्हावे, मंदिरे, मस्जिद , धार्मिक स्थळे इद्यादी चा सर्वांगीण विकास व्हावा अश्या अनेक महत्त्वाच्या बाबींना न्याय देता यावा म्हणून तसेच आमची पोर शिकून उभारली तर पत्र्याच्या घरातून स्लँब च्या घरात आईवडिलांना सांभाळतील हे प्रमुख उदिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन ही निवडणूक प्रामाणिकपणे निवडणूक आयोगाच्या नियमाच्या तसूभरही बाहेर न जाता लढवली.. प्रचार यंत्रणा ताकतीने लढविली.. प्रचारात सहभागी असलेल्या सर्व जिव्हाळ्याच्या माणसानी, मतदारांनी चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता मनापासून साथ दिली.
पैसा , दारू , मटण किंवा कोणत्याही प्रकारे चुकीच्या गोष्टीचा अवलंब न करता किंवा जातीधर्मात विष न कालवता , बंधुभाव व माणुसकी धर्म जपून मानवता हा एकच धर्म डोळ्यासमोर ठेऊन मानवतेच्या कल्याणासाठी गेली तीन महिने घर सोडून गावोगावी मंदिरात, सभागृहात, तांड्यावर मुक्काम करून , विहिरीला, बोअरवेलला, नदीला व ओढ्याला अंघोळ करून , गावोगावी जनतेने जमा केलेल्या भाकरी खाऊन, मित्रांनी आणून दिलेल्या जेवणातून , कधी हाताने बनवून पोट भरली आणि सावंगाड्यासह चालत राहिलो.
पण ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून मी आमदार व्हावे म्हणून मला आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी मी आमदारच असेल..
मला आशीर्वाद देणाऱ्या तसेच न देणाऱ्या सुद्धा सर्व बांधवांची कामे करण्यासाठी मी पुढील काळात बांधील आहे..
कालपासूनच मी कामाला सुरवात केलीय, भविष्यात रात्रंदिवस जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत, शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जीवाच रान करत राहिल.
मला तुमच्या घरातील समजून हक्काने काम सांगत रहा. तुमचा सेवक म्हणून तुमची सेवा करायला मी सज्ज आहे..
तुमचाच
शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे
0 Comments