Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचाराचा रामतीर्थ तांडा येथून नारळ फोडून शुभारंभ

प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे यांच्या प्रचाराचा रामतीर्थ तांडा येथून नारळ फोडून शुभारंभ 



तुळजापूर: विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता खऱ्या अर्थाने पेटत असून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथे प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला आहे. तसेच विरोधकावर हल्लाबोल करत त्यांची पोलखोल केली.

तिसऱ्या आघाडीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी तालुक्यातील रामतीर्थ तांडा येथून प्रचाराची सुरुवात आज दि, ५ रोजी सकाळी केली. तालुक्यातील हगलूर या छोट्याशा गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून तालुका विकासापासून दूर आहे याची जाण लक्षात घेऊन त्यांनी हा लढा उभा केला आहे. श्री दराडे प्रामुख्याने सर्व सामान्याच्या पोरा बाळांना चांगली शिक्षण, तालुक्यात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, रस्ते वीज पाणी, या बाबीकडे ते प्रामुख्याने लक्ष देणार असल्याचे सांगितले आहे. ते नागरिकांशी संवाद साधतेवेळी अण्णासाहेब दराडे यांनी भाजप तसेच काँग्रेस वर हल्लाबोल चढवत पोलखोल केली. जातींची वेगवेगळी वाटणी करून निवडणूक काळात मतदान घेतले जाते राजकारणी प्रत्येक जातीतील एक माणूस सोबत घेऊन त्याचा चेहरा त्या त्या जातीतील लोकांना दाखवून मतदान ओढण्याचा केवीलवाना प्रयत्न करतात हे खऱ्या अर्थाने दुर्भाग्य आहे अशी खंत अण्णासाहेब दराडे यांनी बोलताना व्यक्त केली. मागील दहा वर्षात जितके नारळ मोदी साहेबांनी फोडले नसतील त्यापेक्षा जास्त नारळ मागील दोन महिन्यात आमदारांनी फोडले पण ही काम पुढील पन्नास वर्षांत तरी होतील का हा प्रश्नच असल्याचे सांगितले. या प्रचार शुभारंभास परिसरातील गावातील शेकडो युवक तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे नागरिकांशी संवाद साधताना




Post a Comment

0 Comments