तुळजापूर : दि, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. दि, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी ५१ पैकी २८ उमेदवारांनी आपली अर्ज मागे घेतली आहे आता तुळजापूर विधानसभा निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात आहेत या मध्ये प्रामुख्याने शेतकरी पुत्र तिसरी आघाडीचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे अण्णासाहेब दराडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी काल बॅट चिन्ह मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, सामना चांगला रंगणार आहे, ही लढाई गरीब विरुद्ध श्रीमंत तर प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची होणार आहे, यामध्ये प्रस्थापितांना बाजूला करण्याची भूमिका आपली असणार आहे, आज पर्यंत पाहिलं तर शेतमालाला भाव नाही, सरकारी योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाहीत, मुस्लिम समाज, मराठा समाज, लिंगायत समाज ,धनगर समाज याचे आरक्षण प्रलंबित आहेत, मुख्यतः प्रथम सर्वसामान्याच्या पोरा बाळांना शिक्षणात आरक्षण मिळणे गरजेचे आहे. माझे प्रथम प्राधान्य सर्वसामान्याच्या पोरा बाळांना चांगले शिक्षण देणार असणार आहे. विविध शासकीय कार्यालयातील हजारो जागा भरल्या जात नाहीत अशी प्रतिक्रिया अण्णासाहेब दराडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
0 Comments