उपचारासाठी आलेल्या तरुणीस गुंगीचे इंजेक्शन देऊन डॉक्टरचा तरुणीवर अत्याचार
धाराशिव - उपचारासाठी आलेल्या तरुणीस गुंगीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर त्याच्यावर तसेच याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही खळबळ जनक घटना गेल्या सहा महिन्यापूर्वी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तरुणीचा अत्याचाराचा व्हिडिओ तरुणीस दाखवून ब्लॅकमेल करत तुळजापूर येथे लॉजवर नेऊन पुन्हा अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील ओम साई क्लिनिक येथील डॉक्टर रमेश राजेंद्र लबडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मागील सहा महिन्यापूर्वी पीडित तरुणीस सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने ती आई सोबत डॉक्टर रमेश लबडे यांच्या ओम साई क्लिनिकेत तपासणी केली होती. यावेळी डॉक्टरांनी रक्ताची चाचणी करून सहा इंजेक्शनचा कोर्स करावा लागेल असे सांगून दर दोन दिवसांनी येण्यास सांगितले यावेळी आईसोबत सदरील तरुणी इंजेक्शन घेण्यासाठी दवाखान्यात जात होती पहिले दोन वेळेस डॉक्टरने आईला इंजेक्शन घेतेवेळी पीडिते सोबत आत मध्ये येण्यास परवानगी दिली परंतु तिसऱ्या वेळेस कंपाउंडर ने आईला बाहेरच थांबवत फक्त तरुणीस आत मध्ये बोलवले. यावेळी इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टरने तिच्यावर अत्याचार करत याचा व्हिडिओ बनवला यावेळी पीडीतीने गुंगी येत असल्याबाबत विचारल्यानंतर ॲलर्जी नीट होण्यासाठी इंजेक्शन असल्याने असे होत असे सांगितले मात्र शेवटचे इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर रमेश लबडे यांनी तरुणी सोबत सोबतचा व्हिडिओ दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी देत याबाबत कोठे वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली त्यानंतर दिनांक 16 जुलै 2024 रोजी दुपारी दोन वाजेचा सुमारास पीडित तरुणी कॉलेजमध्ये असताना डॉक्टरने तिला फोन करून नवीन बस स्थानक तुळजापूर येथे बोलून घेतले तेथे वाहन क्रमांक इमेज 25 50 11 यातून तरुणीला शहरातील पुष्प विहार लॉज येथे येऊन तिथे दाखवून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला व व अत्याचाराचा व्हिडिओ दाखवतो सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची व ठार मारण्याची धमकी दिली अखेर घडला प्रकार तरुणीने कुटुंबांना सांगून दि, १ नोव्हेंबर 2024 रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर विरोध फिर्याद दिली त्यानुसार डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0 Comments