तुळजापूर विधानसभा मतदार संघात रंगणार चौरंगी सामना..!
तुळजापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघात चौरंगी सामना रंगणार असून भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील काँग्रेसचे एडवोकेट धीरज पाटील तर समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी व तिसऱ्या आघाडीचे अण्णासाहेब दराडे हे उमेदवार रिंगणात आहेत.
विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही होणारी विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील व काँग्रेसचे एडवोकेट धीरज पाटील ,समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी तर तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाकडून अण्णासाहेब दराडे हे निवडणूक लढवणार आहे.
याचबरोबर वंचित बहुजन आघाडी कडून स्नेहा ताई सोनकाटे यांच्यात ही लढत होणार आहे. तुळजापूर मतदार संघात एकुण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. असे असले तरी यंदा मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे निकालाअंती समजणार आहे.
0 Comments