तुळजापूर बसस्थानकावर बस मध्ये चढताना वृद्ध महिलेचे 32 तोळे सोन्याचे दागिने लंपास
तुळजापूर: धाराशिव येथे लग्न कार्य आटोपून छत्रपती संभाजीनगर-गुलबर्गा बसने उमरगा येथे जात असलेल्या जयश्री घोडके (वय 65) यांचे 32 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी पळवले. ही घटना 3 डिसेंबर रोजी दुपारी तुळजापूर बसस्थानकावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव येथून लग्नकार्य आटोपुन छत्रपती संभाजी नगर गुलबर्गा बसणे उमरगा येथे जात असलेल्या जयश्री घोडके या तुळजापूर बस स्थानकावर बस बंद पडल्याने घोडके या खाली उतरल्या होत्या. उन्हामुळे अंगावरील दागिने काढून त्यांनी कॅरीबॅगमध्ये गुंडाळून पर्समध्ये ठेवले. दुसऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने हातोहात ही पर्स लंपास केली.जयश्री घोडके या आरोग्य विभागात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवानिवृत्त सुपरवायझर असून, त्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून कारवाई करण्याचे सांगितले आहे, परंतु सीसीटीव्ही बंद असल्याचे समजते.सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत 22 लाख असल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. तुळजापूर एसटी स्थानकात गेल्या काही दिवसांपासून चो-यांचे प्रमाण वाढत आहे. एसटीमध्ये चढताना अथवा उतरताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे मौल्यवान वस्तूसह दाग-दागिन्यांवर डल्ला मारत आहेत. एसटी स्थानकात कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक अथवा पोलिस कर्मचारी तैनात नसल्याने स्थानक परिसरात चाेरांचा वावर वाढला आहे.मात्र बस स्थानकावर सोनसाखळी, पाकीट, मंगळसूत्र आदी चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. त्याकडे स्थानक पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
एसटीत चढताना प्रत्येक प्रवासी बसण्यासाठी जागा मिळवण्याची धडपड करत असतो. याच गर्दीत चोरटे धक्काबुक्की करत वादविवाद करत प्रवाशांशी हुज्जत घालत त्या प्रवाशाचे लक्ष विचलित करतात. या सगळ्या गोंधळात दुसरा चोरटा सफाईदार पणे प्रवाशांच्या गळ्यातील मौल्यवान दागिने, बॅगा, मोबाईल चोरून पळ काढतात. ज्यावेळी प्रवाशांना लक्षात येते आपले मौल्यवान वस्तू चोरीला गेले आहे. तो पर्यंत एसटी स्थानकातून निघून गेलेली असते. अशा प्रसंगी प्रवासी एसटीच्या चालक- वाहकांना झालेल्या घटनेची माहिती सांगितले तरी ताचा विशेष काही उपयोग होत नाही. तर दुसरीकडे पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी चोरीला गेलेल्या मुद्देमालाची पावती दाखवाला सांगितले जाते. त्यामुळे परगावातून आलेले प्रवासी चोरीची तक्रार न करताच निघून जातात. यामुळे चोरांची रोजच चांदी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments