Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तर युवा महोत्सवात यश

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजचे जिल्हास्तर युवा महोत्सवात यश


धाराशिव - येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र, धाराशिव आणि राष्ट्रीय सेवा योजना, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ व ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर युवा महोत्सवात श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. युवकांचा सर्वागिण विकास व्हावा तसेच संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीव लागणे या हेतूने प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवांचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवांतर्गत समूह लोकनृत्य, लोकगीत, कथालेखन, चित्रकला, वकृत्व, कविता, युथ आयकॉन इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

या महोत्सवात कॉलेजच्या कु. श्रेया शिनगारे , कु. अक्षरा राजेश सोनवणे, कु. प्रतीक्षा जगन्नाथ धावारे, कु. संध्या राजू कुऱ्हाडे, कु. वर्षा चव्हाण, कु. अंजली रमेश सरवदे, कु. पायल कदम, सागर राजेश गोवर्धन आदींचा समावेश असलेल्या समूहाने लोकनृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. सायली मुंढे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक, कथाकथन स्पर्धेत कु. वैष्णवी खोगरे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक तर चित्रकला स्पर्धेत कु. वैष्णवी नितीन गायकवाड या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. या सहभागी विद्यार्थ्यांना कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सहभागी स्पर्धकांसाठी सांस्कृतिक विभागातील प्रा. श्री. एस. के. कापसे, प्रा. श्री. डी. वाय. घोडके, प्रा. सौ. ए. बी. तुंगीकर, तसेच इतर प्रा. श्री. के. बी. मोहिते, कला शिक्षक श्री. एस. डी. भोसले सर, नृत्यदिग्दर्शक श्री. शुभम खोत आदींनी परिश्रम घेतले. 

या स्पर्धेसाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments