श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मांदीयाळी
तुळजापुर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे कडाक्याच्या थंडीतही तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
बार्शी पौर्णिमा साप्ताहिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 15 रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर सकाळी ऊन वाढत असताना भाविकांचा मोठ्या प्रमाणात ओघ वाढून तो सायंकाळपर्यंत जसाच तसा होता. यामुळे रविवारी तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या धार्मिक विधी साठी दर्शन रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या होत्या. कडाक्याच्या थंडीच्या दिवशीही गर्दी पाहायला मिळाली .पौर्णिमा मंगळवार शुक्रवार रविवार या दिवशी देवी दर्शणार्थ भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. श्री तुळजाभवानी संस्थानचे मार्गशीर्ष पौर्णिमा दिनाची धार्मिक विधी छबिना जोगवा शनिवारी दिनांक 14 रोजी संपन्न झाली शनिवारी रात्री सिंह वाहनावर छबिना संपताच महंत वाकोजी बुवा गुरु तुकोजी बुवा यांनी देवीजींची प्रक्षाळ पूजा केल्यानंतर मंदिर प्रांगणात आपल्या ऊपरण्यात जोगवा मागितल्यानंतर पौर्णिमेच्या धार्मिक विधीची समाप्त झाली.
0 Comments