Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील खेड गावात भानामतीच्या प्रकाराने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव तालुक्यातील खेड गावात  भानामतीच्या प्रकाराने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 



धाराशिव : धाराशिव तालुक्यातील खेड गावात भानामतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खेड गावच्या शिवावर खिळे टोचलेल्या बाहुल्या, लिंबू व गव्हापासून बनवलेल्या महिलेची प्रतिकात्मक मूर्ती टाकण्याचे प्रकार गेल्या पंधरा दिवसापासून लिंबू मिरची बाहुल्या हे शिवावर आणून टाकत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन  तपास करावा अशी मागणी होत आहे.

नरबळी देण्याच्या प्रकारामुळेच घाबरवण्यासाठी हा प्रकार असल्याची गावकऱ्यात चर्चा रंगली आहे. या प्रकारामुळे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेतात जायचे केले भीतीपोटी बंद केले आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनाला कल्पना देऊनही कोणीच फिरकले नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे . नेमका कशामुळे हा प्रकार तपास करण्याची देखील मागणी गावकरी करत आहेत.

Post a Comment

0 Comments