तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला, गाडीच्या काचा फोडून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला घडल्याचा संशय
धाराशिव : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (santosh desmukha murder)यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता तुळजापूर तालुक्यातही सरपंचावर जीवघेणा हल्ला घडल्याची घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला घडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री दि २७ रोजी घडली आहे, ही घटना पवनचक्की वादातून घडल्याचे समोर येत आहे अशा वारंवार होत चाललेल्या घटनेमुळे तालुक्यासह परिसरामध्ये खळबळ उडाली आहे . पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा(mesai Javalga) येथील सरपंच श्री नामदेव निकम हे गुरुवारी दि, 27 रोजी रात्री १ वाजता तुळजापूर येथून गावाकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी दुचाकी वरून येऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीच्या समोरच्या बाजूवर अंडी फेकून मारले तसेच त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला नामदेव निकम हे मेसाई जवळगा या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा हल्ला सुद्धा पवनचक्की वादातून झाला असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झाला आहे. गाडीच्या काचा दगडाने फोडून, पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रात्री १ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
0 Comments