Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे सेवानिवृत्ती निमित्त श्री राजेंद्र हिंगणे सर यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न

तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे सेवानिवृत्ती निमित्त  श्री राजेंद्र हिंगणे सर यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न


तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे दि,२७रोजी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी तालुका तुळजापूर येथे  श्री राजेंद्र हिंगणे सर हे सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त जि प प्रा शा धनगरवाडी येथे धनगरवाडी गावचे माजी सरपंच बिरूनाना दूधभाते यांच्या अध्यक्षतेखाली व अणदुर गावचे सरपंच राम आलुरे व माजी सभापती दीपक आलुरे यांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्ती निमित्त भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी ह भ प श्री अशोकराव जाधव गुरुजी बाभळगावकर  राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी महासंघ यांनी शहाल फेटा व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार केला तसेच त्यांना  पुढील भावी आयुष्याच्या  हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी सहशिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments