बीड जिल्ह्यातील मस्साजोगच्या सरपंचाचे भरदिवसा अपहरण करून हत्या
पवनचक्कीच्या वादातून हत्या झाल्याची चर्चा
बीड: केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचे सोमवारी दुपारी अज्ञात लोकांनी अपहरण केले त्यानंतर सायंकाळच्या सुमारास याच सरपंचाचा मृतदेह आढळून आला हा मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात आणला यावेळी समर्थकासह नातेवाईकांनी गर्दी करीत खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी ते आक्रमक झाले होते.यामुळे केज मध्ये रात्री एक वाजता तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
संतोष देशमुख असे मयत सरपंचाचे नाव आहे केज तालुक्यात सध्या पवनचक्कीचे काम सुरू आहे याचे सर्व साहित्य मस्साजोग परिसरात ठेवण्यात आलेले आहे याच ठिकाणी सहा डिसेंबर रोजी दुपारी च्या सुमारास टाकळी येथील चौघे आले त्यांनी येथील वॉचमन सोबत हुजत घातली कंपाऊंडच्या आत मध्ये जाण्यास विरोध केल्यानंतर या चौघांनी वॉचमनला मारहाण करून वाहनासह आज प्रवेश केला त्यामुळे येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती याची माहिती संतोष देशमुख यांना मिळाल्यानंतर ते देखील तेथे दाखल झाले वादही मिटवला याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात शिवाजी थोपटे या कंपनीच्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून टाकळी येथील अशोक नारायण घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले व अन्य एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान सोमवारी दुपारी मित्रासोबत सरपंच देशमुख हे वाहनातून केज वरून मसाज जोकडे जात होते उमरी परिसरातील टोल नाक्याजवळ तीन वाहने आडवी लावत देशमुख यांची गाडी अडवली त्यानंतर त्यांना गाडीतून खाली ओढत मारहाण केली दुसऱ्या व्यक्तीला तेथेच सोडून सरपंचाचे वाहनातून अपहरण केले याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अपहरणाचा गुन्हाही नोंदवण्यात आला त्यानंतर काही वेळातच पोलिसांना केस तालुक्यातील दैठणा परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळाली खात्री केल्यानंतर हा मृतदेह संतोष देशमुख यांचा असल्याचे समजले तो मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात देण्यात आला.
पोलीसांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न
केज उपजिल्हा रुग्णालयात राजकीय नेत्यासह समर्थक विविध गावचे ग्रामस्थ नातेवाईकांनी गर्दी केली होती यावेळी संतप्त काही लोकांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केल्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले परिसरातील पोलीस ठाण्यासह बीड वरून अधिकारी कुमक मागविण्यात आली होती .बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर अंबाजोगाईच्या चेतना तिडके यांच्यासह अधिकारी कर्मचारी तळ ठोकून होते रात्री नऊ वाजेपर्यंत या प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद नव्हती परंतु खुणाचा गुन्हा नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करावी तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा समर्थकांनी घेतला होता.
कंपनी अन कंत्राटदार यांच्यावर कारवाई करा
या प्रकरणात पवनचक्कीचे काम करणारे आवादा कंपनी आणि संबंधित कंत्राटदार यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक , स्वप्निल गलधर यांनी केली आहे.
तरुण सरपंचाचा खून म्हणजे बीडचा बिहार : खा. बजरंग सोनवणे
सरपंच यांना गाडीत टाकून नेले आणि खून केला घटना दुर्दैवी व प्रचंड वेदना देणारी आहे. तरुण सरपंचाचा खून म्हणजे बीडचा बिहार असे खा. बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. पवनचक्की च्या खंडणी प्रकरणात झालेला खून व त्या मागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक जर फोन उचलणार नसतील तर गंभीर आहे. आपण सदरील प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार असून झालेला खून हा बीड पोलीस यंत्रनेवर प्रश्न उपस्थित करणारा आहे, असेही खा. सोनवणे म्हणाले.
0 Comments