Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील कावलदरा ,बावी परिसरात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ, नागरिकांनी सावधगिरीने राहावे वन विभागाचे नागरिकांना आवाहान

धाराशिव तालुक्यातील कावलदरा ,बावी परिसरात बिबट्या आढळल्याने एकच खळबळ, नागरिकांनी सावधगिरीने राहावे वन विभागाचे नागरिकांना आवाहान 


 धाराशिव:दि १० : तुळजापूर शहरा जवळील बावी - कावलधरा राष्ट्रीय महामार्गावर एका चार चाकी वाहनासमोर मंगळवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्या वावर आढळल्याने शेतकरी वर्गात, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धाराशिव तालुक्यातील कावलदरा राष्ट्रीय महामार्गालगत चार चाकी गाडी समोरून बिबट्या निघून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आढळून आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी रात्री उशिरा रवाना झाले आहेत.

त्यामुळे परिसरातील शेतकरी तसेच गावातील रहिवासी यांनी सावध राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्या आढळून येत आहे तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे व वासरे या बिबट्याने फाडल्याच्या घटना घडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे त्यातच मंगळवारी दिनांक १० डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास धाराशिव तालुक्यातील बावी कावलदरा या राष्ट्रीय महामार्ग लगत एका चार चाकी गाडी समोरून हा बिबट्या पसार झाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी हा बिबट्या पाहिला. त्यामुळे हे बातमी वाऱ्यासारखे सर्वत्र पसरली वन विभागासही खबर देण्यात आली. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी या बिबट्याच्या शोधात रात्री उशिरा घटनास्थळाकडे रवाना झाले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी रात्री सावध राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments