तलावाच्या संपादित जमिनीवर रिन्यु पावर कंपनीने उभारले वीज वितरण केंद्र, पवनचक्क्या कंपन्यांचा मनमानी कारभार संपेना
बीड : भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका पाझर तलाव क्रमांक सात साठी संपादित केलेली जमीन मूळ मालकाने रेणू कंपनीस विक्री केली. कंपनीने तलावासाठीच्या संपादित जमिनीवर वीज वितरण केंद्राची उभारणी केली शासनाने संपादित केलेली जमीन वेळेत शेतकऱ्याच्या नावावरून कमी केली असती तर शेतकऱ्याला जमीन विक्री करता आली नसती तलावाच्या संपादित जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार झाल्याने फसवणुकीचा प्रकार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात उघडकीस आला आहे.
राजकीय आणि प्रशासकीय वरदहस्त असलेल्या पवनचक्कीच्या रेणू कंपनीने तालुक्याच्या पठारे पट्ट्यात पवन ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत. सुमारे 80 पवनचक्की प्रकल्प उभारले गेले आहेत लष्कराच्या उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्लाईंग झोन) हा भाग येत असल्याने लष्कराने आक्षेप घेतल्याने नव्याने उभारणी बंद आहे. वर्षभरात पर्यंत पवनचक्की प्रकल्प उभारताना कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची राजकीय आणि प्रशासकीय वरद हस्तांमुळे अक्षरशा तालुक्यात पवनचक्की कंपनीचा धुमाकूळ झाला आहे. शासनाच्या आणि शेतकऱ्याच्या मालमत्तांचे मोठे नुकसान केले अनेक शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या कंपन्यांनी शेतकऱ्यांची परवानगी न घेता नुकसान भरपाई न देताच शेतजमीन आणि पिकांची नुस्कान केल्याच्या तक्रारी पोलीस आणि महसूल विभागाकडे केल्या मात्र कंपनीकडून मिळणाऱ्या मलीद्यामुळे प्रशासनाने दुर्लक्ष केले तर पोलिसांनी कंपनीची बाजू घेत शेतकऱ्यावर दंडेलशाही केली.
कार्यवाही कोण कधी कशी करणार ?
शासनाने संपादित केलेली जमीन खरेदी करून त्यावर वीज वितरण केंद्र उभारले या प्रकरणात कोण कोणाची फसवणूक केली आणि आता कोण कधी आणि काय कारवाई करणार हा प्रश्न निवृत्तीत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या उपकेंद्रावर राजकीय वरदहस्थामुळे प्रशासन मेहरबान निर्माण राहील की कायदेशीर भूमिका घेऊन उपकेंद्र हटवतील असा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासन कंपनीसाठी सुरळीत काम करेल अशी शक्यता जास्त आहे.
चक्क सरकारी जमिनीवर उपकेंद्र
पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील पाजल तलाव क्रमांक सात साठी शासनाने संपादित केलेल्या जमिनीवर रेणू पवार कंपनीने वीज वितरण केंद्र उभारले आहे. विभागाच्या तलावासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी सर्वे नंबर आठ मध्ये जमीन संपादित केलेली आहे. जमिनीची मूळ मालक लक्ष्मण रामभाऊ ढवळे व त्यांच्या वारसा कडून सुमारे चार हेक्टर जमीन संपादित केली आहे भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी जमीन पाटबंधारे विभागाकडे सोपवली मात्र संपादित केलेल्या जमिनीवर शासन मालकीची नोंद प्रक्रिया केली नाही संपादित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव कायम राहिले कंपनीने वीज वितरण केंद्र उभारणीसाठी ढवळे यांच्या जमिनीची निवड करून जमीन खरेदी केली या ठिकाणी उपकेंद्र उभारले एका सामाजिक कार्यकर्त्याला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने प्रशासनाकडे तक्रार केली उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर वस्तुस्थिती समोर आल त्यानंतर भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांनी संपादित क्षेत्र कमी जास्त प्रक्रियेनुसार शासन मालकी लावण्याचे आदेश दिले या आदेशानुसार धनगर जवळका येथील तलाठ्याने मालकी हक्कात शासनाची नोंद केली.
महसूल प्रशासनाने भूसंपादन करून तलावासाठी जमीन पाटबंधारे विभागाकडे दिली पाटबंधारे विभागाने वेळीच सातबारा नोंद करणे आवश्यक आहे सद्यस्थितीत महसूल विभागाने सातबारावर मालकी हक्काची नोंद केली आहे आता पाटबंधारे विभागानेच कारवाई केली पाहिजे
श्री.डी.बी निलावाड तहसीलदार पाटोदा.
0 Comments