धाराशिव : तालुक्यातील कनगरा येथील ग्रामपंचायतचे सरपंच मधुकर गंगणे यांना सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. जातीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी यांनी गंगणे यांना सरपंच पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की कनगरा येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये पार पडली येथील सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते गंगणे हे हिंदू कलाल ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) या प्रवर्गात येत असताना देखील त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून हिंदू खाटीक या जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून ही निवडणूक लढवली होती ते निवडणुकीमध्ये जिंकल्यामुळे सरपंच पदावर विराजमान झाले या विरोधात विठ्ठल सुरवसे यांनी जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हाधिकारी यांच्याकडे 2023 मध्ये तक्रार केली होती याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन गंगणे यांना सरपंच पदावर राहण्यास पत्र ठरवले.
0 Comments