Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री. दिपक पुजारी 'सेवापूर्ती गौरव सोहळा' संपन्न

धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये श्री. दिपक पुजारी 'सेवापूर्ती गौरव सोहळा' संपन्न



धाराशिव :श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील विज्ञान शाखेला जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करत असलेले श्री. दिपक पुजारी हे त्यांच्या २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. या निमित्ताने कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, कला व वाणिज्य शाखेचे पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर, फोटॉन बॅचचे प्रमुख श्री. भगत सर, श्री. यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, श्री. आदित्यभैय्या पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर, महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. एन. के. मोमीन सर, श्री. व्ही. जी. आंबेवाडीकर सर, श्री. एस. एस. सदाफुले सर, श्री. ऐवळे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्राचार्य श्री. एस. एस. देशमुख सर, प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील सर मनोगते व्यक्त केली. श्री. आदित्य पाटील सर यांनी श्री. पुजारी यांना त्यांच्या अनुभवातून कॉलेजला पुढे मार्गदर्शन करत राहण्याचे आवाहन केले. संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील सर यांनी श्री. पुजारी यांना पुढील आयुष्यात सुख-समाधान व उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments