वाल्मीक कराडची न्यायालयात मोठी मागणी : न्यायालयीन कोठडीत २४ तास मदतनीस हवा ; कोर्टाने काय सांगितलं?
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्याचं प्रकरण संपन्न राज्यात चर्चिल जात आहे . त्यात या हत्यामागील मास्टरमाइंड वाल्मीक कराड याची सीआयडीने याची चौकशी सुरू केली आहे. त्यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात स्वतः पोलिसांना शरण गेले. त्यानंतर त्यांना न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच दिवशी वाल्मीक कराड यांनी याचिकेद्वारे कोर्टाकडे २४ तास एका मदतनीसाची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे .
संतोष देशमुख खून प्रकरणी सीआयडी चौकशीत असलेला वाल्मीक कराड याला ३१ डिसेंबर दिवशी रात्री बीड येथील कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने वाल्मीक कराड याला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. यानंतर वाल्मीक कराड याने पोलिसांकडे काही सुविधांच्या मागण्या केल्या होत्या. त्याला न्यायालयीन कोठडीत आपल्याला २४ तास मदतनीस मिळावा अशी मागणी त्याने केली होती. तसेच जेवणामध्ये खिचडी मिळावी या मागणी कोर्टाने फेटाळून लावल्याचे माहिती समोर आले आहे .
तपासात चौकशी दरम्यान विष्णू चाटे याने दिली कबुली
वाल्मीक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते, अशी कबुली संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने चौकशीत दिली आहे. आरोपी विष्णू चाटे याच्या भ्रमणध्वनी वरून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप केल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते. दरम्यान, आता विष्णू चाटेने वाल्मीक कराड यांनी पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली याची कबुली दिली आहे. याचा संपूर्ण अहवाल सीआयडीने न्यायालयात अहवाल दाखल केला आहे. त्यामुळे वाल्मीक कराड यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
0 Comments