Hot Posts

6/recent/ticker-posts

सोशल मीडियाने मानवी आयुष्यावर आणि सामाजिक जीवनावर झालेले सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम

तंत्रज्ञानाचा हात धरताना : सोशल मीडियाने मानवी आयुष्यावर आणि सामाजिक जीवनावर झालेले सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम 


इंटरनेटचा दैनंदिन जीवनात सुरू झालेला वापर ही एक विसाव्या शतकात झालेली सर्वात मोठी उत्क्रांती आहे सोशल मीडियाच्या वापरामुळे जग जवळ येऊ लागले आहे तंत्रज्ञानातील विविध शोधाचा मानवी आयुष्यावर आणि सामाजिक जीवनावर झालेला सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा आढावा या लेखमालातून आपण घेऊया

मनुष्याच्या आजपर्यंतच्या उत्क्रांतीच्या स्थिरांतराचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की प्रत्येक पिढीने आपल्या आयुष्याचा इतिहास कोणत्या ना कोणत्या प्रकारे पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला आहे. काही पिढ्यांनी गुहेमध्ये चित्र रंगून त्यांचा आयुष्य पुढच्या पिढ्यांना सांगितले तर काही पिढ्यांनी भूर्जपत्रावर लेखन केलं काही पिढ्यांनी संस्था पद्धत वापरली तर काही पिढी आणि लिखित स्वरूपात आयुष्याचा इतिहास जतन करून तो पुढच्या पिढीकडे सुपूर्द केला आहे. काही काळाने संगणक आणि दूरध्वनी आले त्यातून संवाद आणि अतिशय जलद गतीने संवाद साधू जाऊ लागला पण या संवादाचा वेग हा इंटरनेटच्या शोधा नंतर अफाट वाढला.

इंटरनेटच्या शोधा नंतर संवाद साधण्याच्या पद्धतीच्या व्याख्या अंतर्बाह्य बदलून गेल्या इंटरनेटच्या शोधाने संवाद अर्थ शिक्षण मनोरंजन व्यवसाय आणि सगळ्याच क्षेत्रात आपला परिणाम अतिशय जलदरीती दाखवला. फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम लिंक लीड याचबरोबर व्हाट्सअप ,tiktok, youtube या ॲप्लिकेशनचे कामाचे स्वरूप आणि पद्धत जरी वेगवेगळी असली तरी या कामामुळे लोकांना एकाच वेळी अनेक लोकांसोबत संवाद साधताना येऊ लागला. सोशल मीडियामुळे लोकांना कुटुंबीय नातेवाईक मित्र मैत्रिणी याचबरोबर अनुकूल लोकांसोबत जोडल्या जाण्यासाठी एक मोठ्या प्रमाणावर मार्ग मोकळा झाला.

लोक स्वतःचे आयुष्य आणि अनुभवी फोटो रील्स वगैरे माध्यमातून इतरांसमोर व्यक्त करू लागले आणि सामाजिक होणे या शब्दाची व्याख्या काही प्रमाणात बदलू लागली सोशल मीडियामुळे जगाच्या पाठीवर असणाऱ्या कोणत्याही व्यक्ती सोबत एका क्षणात समाज साधन शक्य झालं यामुळे सामाजिक व सांस्कृतिक वैचारिक देवाण-घेवाण होऊ लागली आणि जग जवळ येण्याकडे आपला प्रवास सुरू झाला सोशल मीडिया आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

पूर्वीच्या काही पिढ्यांनी एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन विचारांची आणि भावनांची देवाण-घेवाण केली काही पिढ्यांनी एकमेकांना पत्र लिहिले काही पिढी आणि फॅक्स दूरध्वनी वापरले आताच्या काळात ई-मेल सोशल मीडियामुळे दोन व्यक्तींमधील अंतर कमी झालं जगाच्या पाठीवर कोणत्याही दोन व्यक्ती एकमेकांसोबत एका क्षणात संपर्क साधू लागल्या एकमेकांच्या त्वरित संदेश पाठवू लागल्या व्हिडिओ कॉल द्वारे दृश्य श्राव्य माध्यमातून विचारांची भावनांची देवाण घेऊन करू लागल्या. बऱ्याच नीटकर यांनी त्यांचे नवनवीन मित्र किंवा आयुष्याची जोडीदार हे तिंडर बंबर यासारखे एप्लीकेशन चा वापर करून मिळवले थोडक्यात सोशल मीडियाच्या शोधाने जग वेगवान व्हायला लागला आणि या वेगाबरोबर बरीच आव्हान आपल्यासमोर उभी राहिली इंटरनेटच्या जगाला आभासी जग असं मानलं जाऊ लागले एखाद्या व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे उभी केलेली ओळख आणि खऱ्या आयुष्यात असणारी व्यक्ती यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे असे अनुभव समोर येऊ लागले आहेत.

ऑनलाइन डेंटिंग माध्यमातून ठरवलेल्या विवाह मध्ये घटस्फर्माचे प्रमाण वाढू लागले यामुळे भावनिक असुरक्षितता निर्माण झाली सोशल मीडियाद्वारे नातेसंबंध स्थापन होऊ लागले घडू लागले आणि वेगळी लागली त्यामुळे नात्यालाही भावनिकतेची खोली उथळ होऊ लागली आहे. सोशल मीडिया द्वारे होणारे संवाद हे काही वेळेला तात्पुरते किंवा भावनिक सखोलता नसणारी असू शकतात पण याची जाणीव नसल्यामुळे आपण आपल्याच आयुष्यापासून दूर निघालो आहे की काय ही भावना पुन्हा पुन्हा अधोरेखित होऊ लागली आहे. संवादाची माध्यम बदलल्यामुळे पूर्वीच्या गाठीभेटी दूर व्हायला लागल्या यामुळे सामाजिक कार्यक्रमाचे प्रमाण कमी झाले परिणामी आत्ताच्या पिढीमध्ये सामाजिक कौशल्याचा अभाव जाणू लागला आहे.

आयुष्य जगण्यासाठी गरजेचे असणाऱ्या कौशल्याकडे आपण तडजोड करू लागलो. सोशल मीडियाच्या शोधा नंतर स्वतः समुद्र पार असणारे आपल्या कुटुंबासोबत आपण व्हिडिओ कॉल करू संपर्क साधू लागलो वर्क फॉर्म हो माध्यमातून कोणत्याही व्यक्ती जगाच्या पाठीवर कोणत्याही कंपनीमध्ये काम करू लागली व्यवसायिक जीवन जवळ आलं पण यामुळे वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन यामधील सीमारेषाधुसार व्हायला लागली समोरच्या व्यक्तीने आपल्या गरजेनुसार आपल्यासाठी ऑनलाईन उपस्थिती दाखवायला हवी या अपेक्षेपोटी भावनिक व व्यावसायिक समतोल ढाकूळ लागला आहे.

कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा मोबाईलचे गुलाम झाल्याने भावनिक दृष्ट्या नाकारले जाणे दुर्लक्षित होणे एकटेपणा येणे याचे प्रमाण वाढले परिणामतः त्यातून नैराश्य येण्यासारख्या आजार आयुष्यात निमंत्रित झाला आहे. भावनिक नाती जपण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ही गोष्ट मागे पडू लागली सोशल मीडियामुळे आपण आपली वैयक्तिक खाजगी माहिती सुरक्षित कशी ठेवायची यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे सोशल मीडिया खाते हॅक करून कोणालाही असशील संदेश पाठवणे पैशाची मागणी करणार असे प्रकार ही दिवसेंदिवस वाढू लागले आहेत सोशल मीडियावर स्वतःची स्वच्छ प्रतिमा बनवणे या गोष्टीमुळे एक अदृश्य दडपण तयार होऊ लागलं आपल्यावर टीका होईल की भीती वाटू लागली त्याचबरोबर लोकांना इतरांच्या आयुष्यासोबत सतत स्वतःच्या आयुष्याची तुलना करायची सवय लागली सोशल मीडियाची अतिवापरामुळे नैराश्य भीती वाटणे स्वतःच्या सौंदर्यबाबत समाधान वाटणे एकटेपणा वाटणे याची प्रमाण हे वाढू लागले.

सोशल मीडियाच्या वापरामुळे शरीरात दोपायी नावाचे संप्रदायक स्त्रवु लागते या संपर्कामुळे आपल्या आनंद समाधान आणि विजयाची भावना निर्माण होते पर्यायने आपण सोशल मीडियाच्या सवयीचे गुलाम होतो. सोशल मीडिया मार्फत आपल्याकडे काही सकारात्मक माहिती पोहोचते त्याचबरोबर काही नकारात्मक माहिती पुस्तके मोठ्या प्रमाणात नकारात्मक माहिती मिळत राहणे याचा आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो सोशल मीडियाचे अतिरिक्त वापरामुळे आपल्या मेंदूमधील पेशींच्या कामात अडथळे यायला सुरुवात होते परिणाम एकाग्रतात कमी होते चंचलपणा वाढणे निर्णय क्षमता कमी होणे हे आजार होऊ शकतात सोशल मीडियाचा आयुष्यावर होणारा नकारात्मक परिणाम समजून घेतला आणि त्यानुसार आयुष्य करण्याची पद्धत बदलली तर संभाव्य धोका नक्कीच टाळता येईल.

लेखन : /गायत्री यादव

Post a Comment

0 Comments