Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग जवळ दुचाकी -ट्रकचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार-Naldurg-road-Accidents_

सोलापूर हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग जवळ दुचाकी -ट्रकचा भीषण अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार-Naldurg-road-Accidents


तुळजापूर : सोलापूर- हैदराबाद महामार्ग(Solapur-Hyderabad) जवळील नळदृग(Naldurg) जवळील मज्जिद जवळ  ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात नळदुर्ग येथील युवक जागीच ठार झाले ही  घटना दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की नळदुर्ग येथील युवक अमित नागणे हा नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे दूध आणण्यासाठी दुचाकी वरून जात होता. राष्ट्रीय महामार्ग (National highway)लगत असलेल्या मज्जिद जवळ पाठीमागून आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोराची धडक दिली तसेच धडक दिलेला ट्रक पुन्हा अंगावरून गेल्याने  अमित याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये अमितच्या शरीराचा चेंदामेंदा झाला होता   अमित हा नळदुर्ग येथील प्रगतिशील शेतकरी तथा युवा उद्योजक होता, अमितच्या अपघाती निधनाने नळदुर्ग परिसरात शोककळा  पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नळदुर्ग बायपास रस्त्याचे काम धीम्या गतीने

 गेल्या महिन्याभरापासून या रस्त्यावर आठ जणांना जीव गमवावा लागला आहे, मात्र प्रशासन डोळे झाकून बसले आहे. नळदृग बायपास रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने चालू आहे नळदृग बस स्थानक ते जळकोट या अंतरावर दिवसेंदिवस अपघातामध्ये वाढ होत आहे यामुळे हा रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने तत्काळ लक्ष देऊन हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments