तुळजापूर :तामलवाडी पोलीस ठाण्याचा लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक ५० हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात-
धाराशिव - (दि.१९)तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज शांतीलाल देवकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.१७ जानेवारी रोजी ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले असुन तामलवाडी परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज शांतीलाल देवकर हे कार्यरत आहेत. तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पोलिस अंमलदार यांच्याकडे आहे. सदरील तपास अधिकारी यांना सांगुन नमुद तक्रारदार यांना सदर गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातुन नाव कमी करण्यासाठी यातील आलोसे यांनी १ लाख रुपयांची मागणी करण्यात आली यावेळी दि.१७ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सापळा रचुन पहीला हप्ता ५० हजार रुपये स्वीकारत असतानाच त्यांना रंगेहाथ पकडले असुन पोलिस ठाणे तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याने तामलवाडी परीसरात एकच खळबळ उडाली असुन लाच घेणार्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्याय झाल्यावर अन्यायला वाचा फोडणारे पहिले ठिकाण म्हणजे पोलीस ठाणे संबोधले जाते मात्र हेच पोलीस प्रशासनाला लाचखोरीचे ग्रहण लागल्याने आता न्याय मागायची कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
सदरील कार्यवाही ही सापळा अधिकारी नानासाहेब कदम, सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद जाधव, संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार सिध्देश्वर तावसकर,आशिष पाटील, विशाल डोके, शशीकांत हजारे यांच्या सापळा पथकाने ही कारवाई केली असुन कोणीही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन एसीबीच्या वतीने नागरीकांना करण्यात आले आहे.
0 Comments