धाराशिव: ईट गावचे जवान तेलंगणा येथे शहीद ,व्यापारी पेठ बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
धाराशिव : तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असताना ईट येथील 33 वर्षीय जवान 31 जानेवारी रोजी शहीद झाले ही वार्ता समजतात शनिवारचा आठवडा बाजार बंद ठेवून व्यापारी पेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ईट येथील महेश देशमुख हे 2008 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते सुरुवातीचे काही दिवस सेवा झाल्यानंतर त्यांनी सोल्जर या पदाची परीक्षा दिली यानंतर ते तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद येथे क्लर्क या पदावर रुजू झाले कर्तव्यावर असताना 31 जानेवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. गावचे सुपुत्र महेश देशमुख शहीद झाल्याचे वार्ता समजतात संपूर्ण गावावर शोककळा पसरली शनिवारचा आठवडी बाजार रद्द केला तसेच व्यापारी पेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. शहीद जवान देशमुख यांच्यावर रविवारी सकाळी दहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
0 Comments